HW News Marathi
महाराष्ट्र

औरंगाबाद पदवीधर मतदार संघात राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण दुसऱ्या फेरीत आघाडीवर तर भाजपचे बोराळकर पिछाडीवर

औरंगाबाद | औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाबाबतची सद्यस्थितीची माहिती पाहता अजूनही राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आघाडीवर आहेत. दुसऱ्या फेरीत28 हजार 930 मतांची आघाडी चव्हाण यांनी घेतली आहे. तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर 13,989मते मिळवत पिछाडीवर आहेत.

सतीश चव्हाण यांना 27 हजार 879 मते पहिल्या फेरीत मिळाली होती. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना 10 हजार 973 मते मिळत ते पहिल्या फेरीतही पिछाडीवर होते. सतीश चव्हाण यांना पहिल्या फेरीत तब्बल 16 हजार 906 मतांची आघाडी मिळाल्याचे पाहायला मिळाले होते.

राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पहिल्या फेरीत 27,250 इतकी मते मिळाली तर दुसऱ्या फेरीत 26,627 इतकी मिळाली आहेत. एकूण मते चव्हाण यांना 54,477 इतकी मिळाली आहेत. तर भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांना पहिल्या फेरीत 11,272 इतकी तर दुसऱ्या फेरीत 13,989 इतकी मिळाली असुन एकूण मते 25,547 इतकी झाली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचा पॅटर्न ठरला! 

News Desk

शरद पवार आज राज्याच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यावर

News Desk

“रोज आमचा एक नेता उठतो आणि सरकार पडणार सांगतो….”, पंकजा मुंडेंनी दिला भाजपाला घरचा आहेर

News Desk