HW News Marathi
महाराष्ट्र

हिंदू सणांच्या वेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?; आशिष शेलारांचा सवाल

मुंबई | हिंदू सणांना परवानगी देण्‍याचा विषय आला की, ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल करीत भाजपा नेते व आमदार आशिष शेलार यांनी आज (मंगळवार, २९ मार्च) पुन्‍हा एकदा सरकारवर तोफ डागली आहे. हिंदू नववर्षच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. त्‍यावेळापासून आजपर्यंत याबाबत सरकारकडून कोणत्‍याही स्‍पष्‍ट सूचना आल्‍या नाहीत. त्‍यामुळे आज इलेक्‍ट्रॉनिक मिडियाशी बोलताना आशिष शेलार यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

आशिष शेलार म्‍हणाले की, “ठाकरे सरकारने गुढीपाडव्‍या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूकांना परवानगी देण्‍याची स्‍पष्‍ट भूमिका आजपर्यंत घेतली नाही. त्‍यामुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. ज्‍या ज्‍या वेळी हिंदू सणंचा विषय येतो त्‍यावेळी ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?, असा सवाल त्‍यांनी केला आहे . तसेच मुंबई पोलिसांनी मुंबईत 10मार्च ते ८ ए‍प्रिलपर्यंत जमावबंदीचे आदेश दिले असून त्‍यासाठी आतंकवादी व देशविरोधी शक्‍ती या ड्रोन रिमोट कंट्रोलचा वापर करून हल्‍ला करतील अशी माहिती पोलिसांकडे आल्‍याचे ते सांगत आहेत. अशी माहिती आली असेल तर त्‍याबाबत सुरक्षा यंत्रणांनी खबरदारी जरुर घ्‍यावी. या कारणाने मुंबईत जमावबंदीचे कमल लावण्‍यात आले आहे.”

“या कार्यक्रमात खोडा टाकू नये”

 

“मात्र याच काळात गुढीपाडवा आणि राम नवमीचे कार्यक्रम येतात. म्‍हणून आमचा सरकारला सवाल आहे की, हिंदू सणांचा विषय आला की सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो? आणि रामभक्‍तांचा विषय आला की शिवसेनेची बोटचेपी भूमिका का असते?”, असा सवाल करीत शेलार यांनी सरकारकडे मागणी केली आहे की, संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या दोन्‍ही सणांना परवानगी देण्‍यात याव्‍यात. या कार्यक्रमात खोडा टाकू नये आम्‍ही या मंडळ व समित्‍यांसोबत चर्चा करीत असून या उत्‍सवात भाजपा सहभागी होईल, असेही आशिष शेलार यांनी आज जाहीर केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रामनवमी आणि हनुमान जयंती दिवशी महाराष्ट्रात जातीय दंगली झाल्या नाही, तुम्हाला याचे दुःख, मिटकरींचा राज ठाकरेंना टोला

Aprna

रामदास स्वामी हे शिवरायांचे गुरू नव्हतेच !

News Desk

‘त्या’ ट्वीटमुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अडचणीत

News Desk