HW News Marathi
महाराष्ट्र

भ्रष्टाचारी महविकासआघाडी सरकारच्या राजीनाम्यासाठी भाजपचे उद्या आंदोलन

पुणे | गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अतिशय गंभीर आरोप लावले आहेत. वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझे यांना दिलं होतं, असा खळबळजनक दावा परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील नावाच्या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेला संवाद थेट या पत्रात दिला आहे. या वरुन राज्यातील प्रमूख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आक्रमक भुमिका घेतली आहे.

उद्या (२१ मार्च) भाजप भ्रष्टाचारी महविकासआघाडी सरकारच्या राजीनाम्यासाठी आणि अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करणार आहेत. पुण्यात १०वाजता उद्या अलका टॉकीज चौकात जाहिर निदर्शने केली जाणार आहेत. दरम्यान, देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे, राज ठाकरे, किरीट सोमय्या या सगळ्यांनी अनिल देशमुख यांनी तात्काळ राजीनामा द्यावा असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजब सरकारचे गजब फर्मान; म्हणे,कोंबड्यांचे पोस्टमार्टम करा

swarit

६ जूनला शिवराज्याभिषेकापर्यंत भूमिका घ्या नाहीतर…रायगडावरून आंदोलन जाहीर होणार !

News Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाळधी येथील पाणीपुरवठा योजनेचे ई- भूमिपूजन

Aprna