HW News Marathi
Covid-19

भाजप महाराष्ट्राचा शत्रू कि मित्र ?, जयंत पाटलांचा सवाल

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल(२६ मे) राज्यातील कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी राज्य सरकारवर निशाणा साधताना देवेंद्र फडणवीसांनी केंद्राकडून राज्याला किती आर्थिक मदत करण्यात आली, याचा लेखाजोगा मांडला. देवेंद्र फडणवीसांनी ही संपूर्ण आकडेवारी दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारने आज (२७ मे) पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे. महाविकासाआघाडी सरकारकडून काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात, शिवसेनेकडून अनिल परब, राष्ट्रवादीकडून जयंत पाटील यांनी ही पत्रकार परिषद घेतली.यावेळी बोलताना जयंत पाटील यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. “मुख्यमंत्री निधीला भाजपने एकही नवा पैसा दिला नाही. भाजप महाराष्ट्राचा हितचिंतक नाही. भाजप महाराष्ट्राचा शत्रू कि मित्र ? असा प्रश्न निर्माण होतो. आमच्या सगळ्या प्रयत्नात भाजप कुठेच दिसत नाही. फडणवीसांनी संकटकाळात सरकारच्या पाठीशी राहावे”, असे जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे :

  • महाराष्ट्र आणि मुंबईत स्थिती हाताबाहेर गेली असा समाज जाणीवपूर्वक पसरवला जात आहे
  • देशात सगळ्यात उत्तम काम मुंबई शहरात
  • केंद्र, WHO च्या भाकिताप्रमाणे राज्यातील आकडा वाढला नाही.
  • रुग्णसंख्या नियंत्रणात ठेवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी
  • राज्यात आताच्या घडीला फक्त ३५,१७८ ऍक्टिव्ह केसेस
  • महाराष्ट्रात १०० लॅब सुरु करणार
  • गुजरातपेक्षा महाराष्ट्राची स्थिती निश्चितच चांगली
  • सद्यस्थिती राज्यात ७२ लॅब्समार्फत रोज १३ हजार चाचण्या
  • IFSC केंद्राप्रकरणी फडणवीसांकडून केंद्राची खूप पाठराखण
  • मुख्यमंत्री निधीतून राज्याने सर्व मजुरांच्या प्रवासाचे पैसे खर्च केले
  • मुख्यमंत्री निधीला भाजपने एकही नवा पैसा दिला नाही
  • भाजप महाराष्ट्राचा हितचिंतक नाही
  • भाजप महाराष्ट्राचा शत्रू कि मित्र ? असा प्रश्न निर्माण होतो
  • आमच्या सगळ्या प्रयत्नात भाजप कुठेच दिसत नाही
  • फडणवीसांनी संकटकाळात सरकारच्या पाठीशी राहावे
  • कर्ज घेण्यासाठी केंद्राच्या अटी आम्ही मान्य करणार नाही
  • कर्ज द्यायचे असेल तर खुल्या मानाने द्या
  • संकटकाळात फडणवीसांची वागणूक आम्ही विसरणार नाही
  • ते लोकांच्या मनातून तुम्ही उतरणार, उतरत आहात
  • सगळ्यात जास्त सुविधा महाराष्ट्र मुंबईत

राज्याची मागणीनंतर केंद्राकडून किती मदत ?

  • राज्याने केंद्राकडे ४९,१३,५०० एन-९५ मास्कची मागणी केली, पुरवठा फक्त १३,१३,३००
  • राज्याने केंद्राकडे पीपीई किट्स १७,९३,००० मागणी केली, केंद्राकडून 0 मदत
  • राज्याची केंद्राकडे ४,२२१ व्हेन्टिलेर्सची मागणी, केंद्राकडून 0 मदत
  • केंद्राकडे १५० मल्टिपॅरा मॉनिटर्सची मागणी, केंद्राकडून 0 मदत
  • केंद्राकडे ५० इन्फ्युजन पंपची मागणी, केंद्राकडून 0 मदत
  • केंद्राकडे ३७९ फॉलर बेड्स विथ मॅट्रेसेसची मागणी, केंद्राकडून 0 मदत

कर्जासाठी केंद्राच्या अटी कोणत्या ?

  • शेतकऱ्यांना दिली जाणारी वीज मोफत किंवा सबसिडीसह देऊ नका
  • कामगारांना संरक्षण देणाऱ्या कायद्यांची मोडतोड करा
  • १ नेशन १ रेशन कार्ड योजना सुरु करा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जगात कोरोनाबाधितांचा आकडा ३६ लाखांच्या पुढे, गेल्या २४ तासांत ३ हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू

News Desk

राज्यातील शाळा- काॅलेज ३१ मार्चपर्यंत बंद !मुख्यमंत्र्यांचे आदेश

Arati More

‘बेडूक कितीही फुगला तरी त्याचा बैल होत नाही’, शेलारांचा राऊतांवर हल्लाबोल

News Desk