HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाचे आशिष शेलार यांनी केले स्वागत

मुंबई | वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही, असे भूमिका मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले. आयुक्तांनी काल (१७ मे) सायन रुग्णालयाची पाहाण केल्यानंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला सांगितले. वानखेडे स्टेडियमसह खेळांची मैदाने कोरंटाईन कक्षासाठी न घेण्याच्या निर्णयाचे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत स्वागत केले आहे. शिवाय लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयही योग्यच, असेही शेलार ट्वीटमध्ये म्हणाले.

आशिष शेलार ट्वीटमध्ये म्हणाले, “वानखेडे स्टेडियमसह खेळांची मैदाने कोरंटाईन कक्षासाठी न घेण्याच्या निर्णयाचे स्वागत. पावसाळ्यात मैदाने गैरसोयीची ठरली असती शिवाय खेळाडूंचेही नुकसान झाले असते.भाजप नगरसेविका हर्षीता नार्वेकर यांनी ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणून दिली होती. शिवाय लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णयही योग्यच!”

नेमके काय म्हणाले आयुक्त

वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही, असे भूमिका मुंबई पालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले आहे. इक्बाल सिंग चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, “वानखेडे ताब्यात घेतले जाणार असल्याच्या बातम्या पाहून मला आश्चर्य वाटले. जर खुली मैदाने घेतली आणि पाऊस पडला तर चिखल होईल. चिखल झाल्यानंतर खूप अडचण निर्माण होतील. आपल्याकडे मोठे पार्किंग आहेत ते वापरु शकतो. मैदानात इतके मोठे मंडप उभारु शकत नाही. त्यामुळे असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. कोणतेही मैदान ताब्यात घेतले जाणार नाही”, असेही आयुक्त म्हणाले. सायन रुग्णालयाची पाहाण केल्यानंतर आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले.

संबंधित बातम्या

वानखेडे मैदान क्वारंटाईन सेंटरसाठी घेणार नाही | आयुक्त

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेमडेसिविरच्या नावे दिले पॅरासिटामॉलचे पाणी, बारामतीत ३५ हजारांना बनावट इंजेक्शनची विक्री

News Desk

बीकेसीत कोविड १९ सेंटरचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन, १ हजार बेडची व्यवस्था

News Desk

हे तेच चव्हाण साहेब आहेत, ज्यांनी शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचा सुवर्ण विचार मांडला होता

News Desk