मुंबई | आज (२३ जानेवारी) हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज ९५वी जयंती. त्यांना पंतप्रधानमोदींसह अनेक नेत्यांकडून आदरांजली वाहिली जात आहे. हिंदुत्व आणि शुद्ध भगवा या मुद्द्यांवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरु असतानाच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त केलेले ट्विट चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ‘आमचे मार्गदर्शक’, असा केला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमीत्त राजकीय नेत्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही बाळासाहेबांची भाषणातील काही विधानं असलेला एक व्हिडीओ ट्विट करत अभिवादन केलं. मात्र, सत्ता आणि स्वाभिमान यांच्या संदर्भातीलच विधानं या व्हिडीओत घेतलेली आहेत. त्यामुळे भाजपाचं सत्ता गमावण्याचं शल्य अजूनही कायम असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आमचे मार्गदर्शक, हिंदूत्त्वाचे जाज्वल्य शिवसेनाप्रमुख, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीदिनी कोटी कोटी अभिवादन ! pic.twitter.com/UZVGB7NdnA
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 23, 2021
दरम्यान, आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रमुख नेत्यांकडून बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. मूल्यांशी तडजोड करण्याचा प्रश्न आला तेव्हा बाळासाहेब आपल्या ध्येयापासून कधीच ढळले नाहीत. त्यांनी लोकांसाठी अविरतपणे काम केले, असे पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Tributes to Shri Balasaheb Thackeray Ji on his Jayanti. He was unwavering when it came to upholding his ideals. He worked tirelessly for the welfare of people.
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.