HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे ते हताश असतील; पडळकरांचा शरद पवारांना टोला

मुंबई |  “शरद पवार हे पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे ते हताश असतील, असे म्हणत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे,” असे म्हणत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. पडळकर पुढे म्हणाले, “शरदचंद्र पवार यांचे कालचे भाषण ऐकून मी अवाक झालो. कारण एकीकडे ते आपल्या वयाच्या थोरल्यापणाची मानाची अपेक्षा ठेवतात अन दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी घेऊन फिरतात. शरद पवार हे पुणे मेट्रोच्या कार्यक्रमात आमंत्रित न केल्यामुळे ते हताश असतील. आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवरती यांचा राग यामुळेच आहे. माझ्यासारखा धनगराचा पोरगा असो की शेतकऱ्यांचा सुपुत्र सदाभाऊ असो की वंचितांचा पुत्र राम सातपुते असो यांना देवेंद्रजींनी सत्तेच्या प्रवाहात पुढे आणले. त्यामुळेच प्रस्थापितांचा तीळपापड होतोय. म्हणूनच आमचे बहुजन हितचिंतक देवेंद्रजी यांच्या नजरेत खुपतात.”

“मी पवार साहेबांना सांगू इच्छीतो की फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात भाजपाचे १०५ आमदार तर शिवसेनेचे ५६ अशे एकूण १६१ आमदार महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना पुन्हा आणण्याकरताच निवडून दिले होते. पण, आपल्या नेतृत्वात पावसात भिजून सुद्घा फक्त ५४ च आमदार निवडूण आले. त्यामुळे जनतेने तुम्हालाच निवडूण दिले अशा खोट्या थापा मारू नका. आपण म्हणता मी पुन्हा येऊ देणार नाही. पण तुमच्या पक्ष स्थापनेपासून गेल्या तीसवर्षात तुम्हाला आजपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा मुख्यमंत्रीही बसवता आला नाही. सत्तेसाठी पडती भूमिका घेणे सोपे असते. पण लोकहितासाठी सक्षम भूमिका घेणे कठीण असते,” असा टोलाही पडळकरांनी पवारांना मारला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी सभागृहात ‘निर्लज्ज’ असा शब्द उच्चारला!

News Desk

BMC च्या कामाचे ‘कॅग’कडून ऑडिट; ‘पारदर्शकतेचा आभाव’, फडणवीसांचा आरोप

Aprna

स्वतःचा रक्ताचा भाऊ जेव्हा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन बोलतो तेव्हा !

News Desk