HW News Marathi
महाराष्ट्र

भाजपचे रणनीतीकार आणि चाणक्य… प्रमोद महाजन!

रसिका शिंदे | भारतीय जनता पक्षाचा इतिहास फार मोठा आहे. अनेक दिग्गज नेते भाजप पक्षात होऊन गेले. त्यांनी इतिहास रचला. सध्या भाजपमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना रणनीतिकार आणि आधुनिक युगाचे चाणक्य म्हटले जाते. तर देशांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या उत्तम वक्तृत्व कौशल्यामुळे संपूर्ण जगात एक उत्तम वक्ते म्हणून ओळखले जाते. मात्र, महाराष्ट्रात एक असा नेता होऊन गेला जो उत्तम रणनीतिकार, चाणक्य आणि वक्ताही होता. त्यांचे नाव प्रमोद महाजन. आज भाजपचे ज्येष्ठ नेते स्व. प्रमोद महाजन यांची जयंती आहे.

पत्रकार,शिक्षक ते राजकारणी !

मराठवाड्यात प्रमोद महाजनांचा जन्म झाला. पत्रकार, शिक्षक आणि नंतर राजकारण असा आलेख ते पार करत आधुनिक जगाचे राजकारणी झाले. प्रमोद महाजन यांच्या दुरदृष्टीमुळे राज्यात १९९५ साली बिगर कॉंग्रेसचे सरकार आले. आणि हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या उत्तम मैत्रीमुळे सेना-भाजप युती घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. महाराष्ट्रात तर महाजनांनी आपली पकड बसवली होतीच मात्र, केंद्रातही त्यांचे स्थान होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात ते केंद्रात मंत्रीही होते. त्यांचा राजकीय प्रवास सुरु होताच. मात्र, २००६ साली त्यांच्या भावाने म्हणजेच प्रवीण महाजन यांनी त्यांनी गोळी मारुन हत्या केली होती.

जाणून घेऊयात प्रमोद महाजनांबद्दल काही गोष्टी…

प्रमोद महाजनांचा जन्म ३० ऑक्टोबर १९४९ ला आत्ताच्या तेलंगाना आणि तेव्हाच्या महबूबनगरमध्ये झाला होता. सुरुवातीच्या काळात ते आरएसएसे सदस्य होते. त्यानंतर १९७० साली तरुण भारत या मराठी वृत्तपत्राचे ते उप-संपादक झाले आणि पत्रकारितेत पुण्यातून त्यांनी आपले शिक्षणही पुर्ण केले. त्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले. मात्र, राजकारणातील रुची वाढत गेल्यामुळे त्यांनी शिक्षकी पेशा सोडत आरएसएसचे प्रचारक म्हणून पुढची वाट धरली. त्यानंतर १९८३-८५ या काळात ते पक्षाचे अखिल भारतीय सचिव होते आणि त्यानंतर ते याच पक्षाचे अध्यक्षही झाले.

RSS प्रचारक ते मंत्री

आधुनिक पद्धतीच्या राजकारणाचा विचार करणाऱ्या महाजनांनी लालकृष्ण अडवाणी यांच्या रथ यात्रेतही काम केले होते. तसेच, असे म्हटले जाते की शिवसेना आणि भाजप यांच्या गठबंधनात प्रमोद महाजन यांचा मोठा वाटा होता. आणि भाजप पक्षातील ते असे एकमेव नेते होते जे बाळासाहेब ठाकरे यांच्या जवळ होते आणि बाळासाहेबांचा त्यांच्यावर विश्वास होता. भारतीय जनता पक्षाला देशातील प्रमुख विरोधी पक्ष समजले जात असतांना प्रमोद महाजन हे भाजपाच्या पहिल्या फळीतील प्रमुख नेत्यांपैकी एक होते. १९९६ साली वाजपेयी सरकारच्या अवघ्या १३ दिवसांच्या सरकारमध्ये प्रमोद महाजन यांनी संरक्षण मंत्री म्हणुन शपथ घेतली होती.

पुढे जेव्हां भारतीय जनता पक्षाचे पाच वर्षांचे पुर्ण सरकार आले त्या काळात प्रमोद महाजन यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली होती. शायनिंग इंडिया ही मोहिम प्रमोद महाजनांचीच कल्पना! दुर्देवाने ही मोहीम अयशस्वी झाली आणि त्यावेळी निवडणुकीत आलेल्या अपयशामुळे भारतीय जनता पक्षाला सत्तेपासुन दुर जावे लागले.प्रमोद महाजन यांच्याकडे उत्तम नेर्तृत्वक्षमता असल्याने भावी पंतप्रधान म्हणुन देखील त्यांच्याकडे पाहिले जायचे. अटल बिहारी वाजपेयी यांच्यानंतर कोण? या पक्षाला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर म्हणुन लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे पाहिले जात होते.मात्र दुर्दैवाने त्यांची हत्या झाली आणि देशाने एक मोठं नेतृत्व गमावले !

प्रमोद महाजन यांच्या निधनानंतर माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांनी असे म्हटले होते की, “देशाने एक कुशल संघटक, उत्तम वक्ता आणि तरुणांचा एक आक्रमक प्रतिनिधी गमावला आहे”. प्रमोद महाजन यांच्या जाण्याने मोठी पोकळी राजकारणात नक्कीच निर्माण झाली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्राच्या औद्योगिक शहराची नगरपरिषद दत्तक, नितीन गडकरींनी उचललं पाऊल

News Desk

मुख्यमंत्री आणि आदित्यंविरोधात आक्षेपार्ह ट्विट करणाऱ्या व्यक्तिला निलेश राणेंचा पाठिंबा !

News Desk

भाजपचे संपर्क फॉर समर्थन सर्वात घाणेरडा कार्यक्रम | संजय निरुपम

News Desk