HW News Marathi
महाराष्ट्र

जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज !

पुणे | जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहेत, असे म्हणत नाव न घेता भाजप नेते उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टोला लगावला आहे. उदयनराजे पुढे म्हणाले की, “जाणता राजा ही उपमा देताना जरा विचार करा, आपण कोणी शिवाजी महाराज होऊ शकत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करणे अत्यंत चुकीचे असल्याचेही उदयनराजेंनी सांगितले. ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक रविवारी (१२ जानेवारी) प्रकाशित करण्यात आले. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज केल्यामुळे देशभरात शीवप्रेमींनी संताप व्यक्त केला होता. या पार्श्वभूमीवर उदयनराजे भोसले यांनी आज (१४ जानेवारी) पुण्यात पत्रकार परिषद घेतली आहे.

उदयनराजे भोसले म्हणाले की, ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशि झाल्यानंतर वाईट वाटले. लोकांनी बुद्ध गहाण ठेवली आहे का?, असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला आहे. या पुस्तकाचा मी निषेध करतो आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची उंची कोणीही गाठू शकणार नाही, असे उदयनराजे म्हणाले.

उदयनराजे पुढे म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार आचरणात आणू शकतो. पण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जवळ देखील जाऊ शकत नाही.” मागील जन्मी मुंगी एवढ पुण्य केल असेल म्हणून छत्रपती घराण्यात जन्म झाला. हे माझ सौभाग्य मानतो. शिवसेना काढली तेव्हा वंशंजांना विचारायचा आला होता का?, असा उलट सवाल उदयनराजेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना करत त्यांच्याव चिडले. महाशिवआघाडीमध्ये शिव काढून टाकले ? का तर सोयीप्रमाणे शिवरायांचा वापर करायचा, असा आरोप देखील उदयनराजेंनी राऊतांवर केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खतांची दरवाढ रद्द झाली, आता प्रामाणिकपणे मोदीजींचे आभारही माना!

News Desk

अखेर बीड अ‍ॅसिड हल्ला प्रकारणातील आरोपीला अटक

Gauri Tilekar

“शरद पवार तूर्तास वामकुक्षी घेतायत का?” अतुल भातखळकरांची खोचक टीका!

News Desk