HW News Marathi
महाराष्ट्र

मोदी-ठाकरेंमध्ये विसंवाद करणारे दररोज टीव्हीवर येतात !

मुंबई । मोदी आणि ठाकरेंमध्ये विसंवाद करणारे दररोज टीव्हीवर येतात, हे कोण आहे जनतेला दिसते, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊता यांना केला आहे. शेलार पुढे म्हणाला की, शिवसेनेचे पतंप्रधान मोदींवरचे प्रेम स्वार्थी की निस्वार्थी?, असा सवाल शेलारांनी राऊतांना केला आहे. शेलार पुढे म्हणाले की, मोदी आणि ठाकरेंमध्ये विसंवाद करणारे दररोज टीव्हीवर येतात, हे कोण आहे जनतेला दिसते, असा आरोप शेलारांनी राऊतांवर केला आहे. शेलार यांनी आज (१५ नोव्हेंबर) पत्रकार परिषद शिवसेना आणि राऊतांवर तोफ डागली. ‘अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे समजण्यासाठी संजय राऊतांना बरेच जन्म घ्यावे लागतील,’ असा टोलाही शेलारांनी राऊतांना लगावला आहे.

शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले की, “खऱ्या अर्थाने पाहिले तर भाजप आणि इतर पक्षाचे नेते ‘मातोश्री’वर आदरपोटी जायचे. मात्र आज सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेचे नेते फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बैठकीसाठी जात आहेत. आधी मातोश्रीहून कुणी राज ठाकरे यांना सुद्धा भेटायला जात नव्हते. मात्र, आता माणिकराव ठाकरे यांना भेटायला सुद्धा जात आहेत, असे म्हणत शेलार यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ‘मी पुन्हा येईन’ असे सारखे म्हणणार नाही. पण पुढचे पाचच काय, तर पुढचे २५ वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री असेल, असा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला.

तसेच “वय वाढल्यावर परिपक्तवता वाढावी,” असा टोला शेलारांनी राऊतांना त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने शुभेच्छा देत लगावला आहे. तसेच शेलार म्हणाले की, “आमच्यात एकवाक्यता आहे,” असा दावाही शेलारांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. तसेच राज्यातील सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर भाजप लक्ष ठेवून असल्याचे शेलार यांनी सांगितले. जपच्या कार्यकारिणीची बैठक काल (१४ नोव्हेंबर) आयोजित केली होती. या बैठकीनंतर बोलताना शेलार म्हणाले की, “आमचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस हेच आहेत. सत्तास्थापनेच्या तीन अंकी नाटकावर आम्ही लक्ष ठेवून आहोत,” असेही ते म्हणाले. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना मार्गदर्शन केले.

 

Related posts

भामरागड तालुक्यातील शंभर गावांचा जिल्हाशी संपर्क तुटला

News Desk

संजय राठोड कोणत्याही क्षणी पोहरादेवीत दाखल होणार, पारंपारिक वाद्य वाजवून होणार स्वागत

News Desk

राजकीय नेत्यांनी जनतेला दिला सोशल मीडियावरुन धीर

swarit