HW News Marathi
महाराष्ट्र

शरद पवारांवर टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांच्या निषेधार्थ पुण्यात उद्या आंदोलन

मुंबई | ‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे’, अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी काँग्रेस उद्या (२५ जून) आंदोलनाची हाक दिली आहे. पडळकरांनी शरद पवार यांच्याविषय बोलताना अतिशय वाईट भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात वैचारिक मतभेद असतात, म्हणून एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन, असे वक्तव्य करणे, हे भाजप पक्षाच्या संकृतीचा शोभते का?, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी भाजपला विचारला.

गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात उद्या सकाळी १० वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती अंकुश काकडे यांनी दिली आहे. तसेच पडळकरांच्या वक्तव्याचा निषेद करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येथे येण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

संबंधित बातम्या

एखाद्या व्हायरसप्रमाणे आपला राजकीय रंग बदलणे पडळकरांचा गुणधर्म | प्राजक्त तनपुरे

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना !

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाविकास आघाडीतील तीनही पक्ष कोणत्याही दबावाला बळी पडणार नाहीत! – नाना पटोले

Aprna

महिलांबाबतच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस माफी मागा, आदित्य ठाकरेंची मागणी …

Arati More

राणा दाम्पत्यांविरोधात शिवसेना अमरावतीत आक्रमक, फोटोंना चपलांचा हार घालत घोषणाबाजी

News Desk