HW News Marathi
महाराष्ट्र

…अन् पंकजा मुंडे ऊसाच्या फडात कामगार महिलांसोबत पोटभर जेवल्या

बीड । लोकनेते गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीनिमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडेंनी परळी तालुक्यातील गोवर्धन हिवरा या गावी जाऊन उसाच्या फडात ऊसतोड कामगार महिलांशी हितगुज केलं. या महिलांच्या रोजच्या दिनचर्येबाबत माहिती घेतली. एक दिवस कामगारांसोबत पंकजा मुंडेंनी संकल्प केला होता. यावेळी पंकजा मुंडेंनी कामगार महिलांसोबत बाजरीची भाकरी आणि ठेचा खाल्ला. तर आपण सोबत आणलेला जेवणाचा डब्बा या महिलांना दिला.

 

पंकजा मुंडे आपल्या भावना व्यक्त करताना यावेळी म्हणाल्या की, येथील कामगार महिलांच्या आरोग्याच्या, क्षिक्षणाच्या अनेक समस्या आहे. पहिल्यांदाच मला ऊसतोड कामगार महिलांसोबत त्यांच्या अडचणी त्यांच्याच तोंडून ऐकण्याची संधी मिळाली. ऊसतोड कामगार मजुरांचा प्रश्न मार्गी लावण्याचा मुद्दा सरकार गांभीर्याने घेत नाही. त्यातले काही प्रश्न मात्र जिल्हा पातळीवर तात्काळ सोडविणं गरजेचं असूनही तसं केलं जात नाही. राजकारणी याचं निव्वळ भांडवल करत असून हा मुद्दा अधिक गांभीर्याने घेणं गरजेचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या.

 

ऊसतोड कामगारांच्या लसीकरणाबाबत बोलताना पंकजा मुंडेंनी म्हटलं की, ऊसतोड कामगार महिलांचं लसीकरण काही प्रमाणातच झालं असून यांच्यात जागृती होणं गरजेचं आहे.” तर, ज्या ज्या ठिकाणी ऊसतोडणी होणार आहे त्या त्या ठिकाणी लसीकरण कॅम्प घेण्याचे आवाहनही यावेळी पंकजा मुंडेंनी केलं आहे. गोवर्धन हिवरा या ठिकाणी उसाच्या फडात लसीकरण कॅम्प घेण्यात आला या ठिकाणी महिलांचे लसीकरण करण्यात आलं. जनसामान्यांची सेवा करने हीच खऱ्या अर्थाने लोकनेत्यांना आदरांजली असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेचे माजी आमदार कैलास पाटील राष्ट्रवादीत; एकनाथ खडसे गटाकडून शिवसेनेला हादरा

News Desk

‘पंकजांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही’,फडणवीसांचं पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ भाषणावर उत्तर

News Desk

विधानसभेच्या कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; २७ फेब्रुवारी रोजी मतदान

Aprna