मुंबई | कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याने आता निरबंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. मात्र लोकल साठी अजूनही सामान्य जनतेला प्रवास करण्यासाठी मनाई आहे. दोन डोस घेतलेल्यांना लोकल मधून प्रवास करण्यास परवानगी द्यावी म्हणून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात आली मात्र अजूनही निर्णय घेतलेला नाही. याच प्राश्वभूमीवर भाजपने आज(६ ऑगस्ट) मुंबई रेल भरो आंदोलन सुरु केलं आहे.
पश्चिम आणि मध्य रेल्वेवर आंदोलन
भाजपने आता लोकलच्या निर्णयासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे चर्चगेट स्थानकावर रेलभरो आंदोलन करत आहेत. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरु करावी या उद्देशाने हे आंदोलन कारणात आलं. पश्चिम सहा मध्य रेल्वे वर हे आंदोलन करण्यात आलं आहे.
BJP workers stage protest at Churchgate over resumption of local train services in Mumbai City; several held.
This is govt's dictatorship through police, but our protest is for the common man. The state doesn't let us protest, nor does it resume services: Pravin Darekar, BJP pic.twitter.com/xHtGHb8FZ2
— ANI (@ANI) August 6, 2021
संयम सोडू नका
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते खार एच पश्चिम विभागातील पालिका विभागीय कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते बोलत होते. जिथे जिथे लॉकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता देऊ शकलो नाही तिथल्या नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना विनंती करतो की कृपया संयम सोडू नका. कोणी दुश्मन आहे आणि कोणी लाडके आहेत असं काही नाही. सर्व नागरिकांच्या जीवांची काळजी आहे. त्यामुळे या गोष्टी कराव्या लागतात, असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.