HW News Marathi
महाराष्ट्र

निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा – पंकजा मुंडे

नवी दिल्ली। भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. तर दिल्लीत पंकजा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली. आणि यावेळी पत्रकार परिषदेची सुरुवात मुंडेंनी भाजपच्या बैठकित झालेल्या चर्चेने केली. पक्षांतर्गत विषयांवर भाजपच्या बैठकित सकारात्मक चर्चा झाली. राजकीय पाऊल आम्ही जेवढे भक्कम उचलतो, तेवढी सामाजिक पावले देखील भक्कम उचलली पाहिजेत अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे पाच राज्यातील निवडणुका- निवडणूक लढविण्यात भाजपचा मोठा हातखंडा आहे पंकजा मुंडे म्हणाल्या.

म्हणूनच महाराष्ट्रात ओबीसींमध्ये तीव्र संताप

महाराष्ट्राला ओबीसींचे आरक्षण मिळालेला आहे ते आरक्षण 50 टक्‍क्‍यांच्या वर झालं होतं तर 50 टक्के आरक्षण रद्द होईल अशी शंका असताना सर्वच आरक्षण रद्द झालं म्हणूनच महाराष्ट्रात ओबीसींमध्ये तीव्र संताप आहे. त्याच्यातून आम्ही वेळोवेळी सामाजिक आणि राजकीय भूमिकेतून बोललो आहे अशी खंत देखील पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

मराठा समाजासमोर मोठा प्रश्न

तर दुसरीकडे मराठा समाजाचं आरक्षण दिलेले होते ते देखील रद्द झालेला आहे म्हणून मराठा समाज देखील नाराज झाला आहे. म्हणूनच आरक्षणाच्या संदर्भात मराठा समाजासमोर देखील मोठा प्रश्न उभा आहे. तर काही राज्यांनी आपापल्या लेव्हलवर निर्णय घेतले आहे त्यांच्या राज्याच्या एकूण संख्येवर त्यांनी निर्णय घ्यायला हवेत अशा प्रकारची व्यवस्था देखील आहे असे देखील मुंडे दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.शेवटी घटना राज्याचे आणि केंद्राचे अधिकार फार क्लियर आहे.

दुष्काळामुळे अनेक कारखान्यांना फटका

राज्यात सहकाराची प्रश्न देखील अनेक आहेत. दुष्काळामुळे अनेक कारखान्यांना फटका बसलेला आहे आणि त्यातच मी देखील भाग आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. त्यामुळे ऊस गाळप करत असताना शेतकऱ्यांना वेगळी वागणूक न देता ऊसाचे भाव जसे वाढवतो तसेच साखरेच्या भावाबाबतही व्हावे असेही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे कारखाने चालू होती शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही आणि राजकीय हस्तक्षेप देखील होणार नाही याची काळजी घेणं महत्त्वाचं असल्याचं देखील पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले. याबरोबरच महागाई वर देखील तोडगा निघाला पाहिजे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला पाहिजे आणि यावर लवकरच तोडगा निघेल आणि तसे प्रयत्न देखील केंद्रीय स्तरावर सुरू असल्याचं मुंडे म्हणाल्या.

एका वाक्यात उत्तर

याबरोबरच माध्यमांनी पंकजा मुंडे यांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारला की राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांची आज समोर चौकशी आहे या संदर्भात पंकजा मुंडे यांनी एका वाक्यात उत्तर दिले की ते सहकार्य करतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री? मोदी, शहा जोडी कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब!

News Desk

‘एमपीएससी’ रिक्त पदे भरण्याचा मार्ग झाला मोकळा – उपमुख्यमंत्री अजित पवार

News Desk

ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या हिट विकेट पडतायत, गुगलीचीही गरज नाही !

News Desk