HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी कल्याणमध्ये १ जण आढळला कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई | संपूर्ण जगभरात कोरोनाची दहशत पसरली असताना एकीकडे कोरोनावरील लसीचा शोध सुरु आहे. किंबहूना काही लसी या अंतिम टप्यात आहेत तर काही ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. अशातच ब्रिटनमध्ये कोरोनाच्या एका नव्या प्रजातीचा प्रसार सुरु झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे.

आता कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात ४५ जण ब्रिटनहून परतल्याची आणखी एक धक्कादायक माहिती प्राप्त झाली आहे.  यात एका जणाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.  एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून  इतर ७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.  पुढील चाचणीसाठी त्या व्यक्तीचे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्थेकडे पाठवले जाण्याची शक्यता आहे.

Related posts

महापुरुषांच्या नावाचा गैरवापर करणे म्हणजे अक्षम्य चुक – रोहित पवार 

News Desk

बिहार देवेंद्रजीनी आणले महाराष्ट्राला पण देवेंद्रजीच पाहिजे..! 

News Desk

आज ८४१ नवीन रुग्णांचे निदान, राज्यात एकूण १५ हजार ५२५ रुग्ण

News Desk