नवी मुंबई | नवी मुंबईतील सिडको घरांसाठी बम्पर लॉटरी जाहीर झाली आहे. सिडकोने यावेळी तब्बल १४ हजार ८३८ घरांची लॉटरी काढली. अत्यल्प आणि अल्प गटासाठी लॉटरी काढण्यात आले आहे. ही सर्व घरे सामान्या नागरिकांना अडीच लाख रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. सिडकोच्या घरांसाठी १३ ऑगस्टला (आज) पासून ते १५ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.
नवी मुंबईतील घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी या भागात सिडकोने घरे उभारलेली आहेत. एमएमआरडीए रेंजमध्ये म्हणजेच मुंबई नवी मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या भागात ज्यांच्या नावावर घरे आहेत, त्यांना या घराचा लाभ घेता येणार नाही.
सिडकोच्या घराचे क्षेत्रफळ
अत्यल्प आणि अल्प आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) १८ लाखांचे तर २५.८१ चौ.मी म्हणजे २७७ चौरस फूट ऐवढे क्षेत्रफळ आहे. तर अल्प उत्पन्न गटासाठी (LIG) २६ लाखांच्या घराचा एरिया २९.८२ चौ. मी (३२० चौरस फूट) आहे. सिडकोची ज्यांना लॉटरी लागणार त्यांना २०१९ मध्ये ताबा देण्यात येणार आहे.
कोणत्या भागात किती घरे
- अत्यल्प गटासाठी तळोजा – २८६२, खारघर – ६८४, कळंबोली – ३२४, घणसोली – ५२८, द्रोणागिरी – ८६४
- अल्प उत्पन्न गटासाठी तळोजा – ५२३२, खारघर – १२६०, कळंबोली – ५८२, घणसोली – ९५४, द्रोणागिरी – १५४८
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.