HW News Marathi
महाराष्ट्र

राष्ट्रवादीला गळती नाही, ‘हा’ तर राजकीय भ्रष्टाचार !

मुंबई | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये आऊटगोईंग सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुणे येथील त्यांच्या पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी देखील शिवसेना-भाजपवर टीका केली आहे. “राष्ट्रवादीला गळती लागल्याचे म्हटले जात आहे. मात्र, तसे काहीही नाही. हा राजकीय भ्रष्टाचार आहे. भाजप जर असे करत असेल तर तो सत्तेचा गैरवापर आहे”, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

“भाजपचे शतप्रतिशत यश म्हणजे अन्य पक्षाचे पदाधिकारी फोडणे हेच आहे का ? असा सवाल देखील धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला. पुरोगामी महाराष्ट्रातील जनता निवडणुकीच्या तोंडावर सुरु असलेले शिवसेना-भाजपचे हे राजकारण खपवून घेणार नाही”, असेही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. दरम्यान, यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. त्यावर, “जे आमच्या पक्षात येत आहेत त्यांना कोणत्याही प्रकारची भीती दाखवण्याची आम्हाला गरज नाही. ते सर्वजण स्वखुशीने भाजपमध्ये येत आहेत”, असे प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊतांची महाराष्ट्रातही निवडणुक लढवण्याची हिंमत कधी झाली? – चंद्रकांत पाटील

News Desk

आता फडणवीस अन् राणे दोघेही जोड्याने मुख्यमंत्रीपदाची स्वप्न बघतील !

News Desk

आपण यांना पाहिलात का?

News Desk