HW News Marathi
महाराष्ट्र

जमावबंदीच्या आदेशाचं उल्लंघन केल्याने नितेश राणे, निलेश राणेंवर गुन्हा दाखल!

सिंधुदुर्ग। जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी, शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रखरणी व कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल झाले आहेत.शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर भाजपचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत.

राणे भावंडांवर गुन्हा दाखल

जमाव बंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी, शिवसेना आमदार वैभव नाईक, भाजप आमदार नितेश राणे, निलेश राणे यांच्यासह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेत जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रखरणी व कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप व सेनेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर कणकवलीत गुन्हे दाखल झाले आहेत.

आम्ही सभ्यपणा पाळतोय, कुंडल्या आमच्याकडेही आहेत

शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह ३० ते ४० शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. तर भाजपचे आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे यांच्यासह ५० ते ६० व्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत.“जठार छत्रपती संभाजी महाराजांची राणेंशी तुलना करतात. ज्यांनी राणेंच्या विरोधात आयुष्य घालवलं. सेनेतून अनेक जण गेले, पण ह्यांच्या सारखा उतमात कोणी केला नाही. पण उध्दवजीनी सांगितलं, वेडंवाकडं केलं तर सोडणार नाही”, असंही राऊतांनी सांगितलं.

म्हणून मी आज नाशिकला आलोय!

राणेंच्या विरोधात जिथून पहिली ठिणगी पडली त्या नाशिकचं कौतुक करताना संजय राऊत म्हणाले, “गुन्हा दाखल करण्याचं हिमतीच काम नाशिकमध्येच होऊ शकत, हे मला माहिती होतं. ज्या हिमतीने तुम्ही ही लढाई लढता आहात, त्या साठीच मी नाशिकला आलोय. भविष्यात नाशिक हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक आणि दिशादर्शक असणार आहे.”संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राऊतांचा नाशिक दौरा महत्त्वाचा आहे. आज शिवसेनेच्या कार्यक्रमात राऊतांनी राणेंचे अक्षरश: वाभाडे काढले तसंच जे वादळ उठलंय ते अद्याप संपलेलं नाही, असं म्हणत राणेंना एकप्रकारे इशाराच दिला.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवभोजन केंद्रामधून दारू विक्री, हे कसले वचन दिले होते स्व. बाळासाहेब ठाकरेंना?

News Desk

कुणाला किती मुलं होती,कुणाचं लग्न झालं होतं,सांगू का ? मुंडे प्रकरणावरून अजित पवारांचा विरोधकांना इशारा !

News Desk

“बीडमध्ये माफिया राज बोकाळल्याचा अजून कोणता पुरावा हवाय?” – पंकजा मुंडे

Aprna