HW News Marathi
महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत रिक्षातून अनोखी सफर…!

बारामती। पुणे जिल्ह्याचे पालक मंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नेहमीच आपल्या रोखठोक आणि बेधडक स्वभावामुळे चर्चेत असतात. आज तर अजित पावर यांनी चक्क रिक्षाची ट्रायल घेतली. अजित पवार हे आज (28ऑगस्ट) बारामतीच्या दौऱ्यावर आहेत.

बारामती औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या पियाजियो कंपनीने इलेक्ट्रिक रिक्षा ची निर्मिती केली आहे. या रिक्षाची पाहणी करताना पवारांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती घेतली त्यानंतर मात्र अजित पवार थेट रिक्षात बसले आणि परिसरातून रिक्षाची ट्रायल घेतली.गेल्याच आठवड्यात अजित पवारांनी एका चहाच्या टपरीवर चहाचा आस्वाद घेतला होता. त्यापूर्वी एका पान टपरी वर त्यांनी पान देखील खाल्ले होते. त्यामुळे आता अजित पवार यांची चर्चा सुरू झाली.

भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन

भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्रातील तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ नवीन अत्याधुनिक प्रणाली विकसित करुन भूजल विकास व व्यवस्थापन आराखडा तयार करुन तो सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवतील. सामान्य जनता आणि शासन यांच्यामधील दुवा बनतील, अशी खात्री अजित पवार यांनी व्यक्त केली.भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून उभारण्यात येत असलेल्या भूजल माहिती व तंत्रज्ञान केंद्राचे भूमीपूजन पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे उपस्थित होते.

यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (व्हीसीद्वारे), जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थितीत होत्या. तर भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल चव्हाण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या जमिन व्यवहाराची चौकशी सुरु

News Desk

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात

Gauri Tilekar

वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा! – उद्धव ठाकरे

Aprna