पुणे | डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी सचिन अंदुरेला प्रथम पुणे न्यायालयाने २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणाची चौकशी करण्यासाठी सीबीआयने १४ दिवसांच्या कोठडीची मागणी केली आहे.
Pune: Sachin Andure an accused in 2013 Dabholkar murder case sent to CBI custody till 26 August. He was arrested by Central Bureau of Investigation yesterday #Maharashtra pic.twitter.com/IqhzU8Clba
— ANI (@ANI) August 19, 2018
सचिन अंदुरेला आज (रविवारी) पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते. सचिनला दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सीबीआयने अटक केले आहे.न्यायालयात नेहण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वसईतून एटीएसने ताब्यात घेतलेल्या शरद कळसकरच्या चौकशी दरम्यान दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी सचिनचे नाव समोर आले.
यानंतर त्याला सीबीआयने औरंगाबादमधून सचिनला ताब्यात घेतले. कुठलाही पुरावा नसताना सचिन अंदुरेला अटक करण्यात आल्याचे त्यांचे वकील प्रशांत सलसिंगीकर यांनी न्यायालयात सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.