HW News Marathi
महाराष्ट्र

“आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावा”, राज्यसरकारला केंद्राकडून पत्र

मुंबई। कोरोनाचे रुग्ण कमी होत असले तरी देखील त्याचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात गर्दी टाळण्यासाठी स्थानिक स्वरूपाचे निर्बंध लावण्यात यावेत अशी सूचना केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी मुख्य सचिवांना एका पत्राद्वारे केली आहे. महाराष्ट्रात संसर्ग कमी होत असला तरी काही जिल्ह्यांत पॉझिटीव्हिटी दर आणि कोविड रुग्णांची संख्या वाढत असल्याने केंद्राने ही सूचना केली आहे.

केंद्राकडून सरकारला दुजोरा

राज्य सरकारने कोरोनाचं संकट लक्षात ठेवता सणांवर निर्बंध लावले आहेत. राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचं सांगून त्याला दुजोरा दिला आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पत्राच्या अनुषंगाने केले आहे.

कोविडचा धोका अजून गेलेला नसल्याने हे उत्सव सुपर स्प्रेडर्स ठरू शकतात अशी भीती आयसीएमआर आणि एनसीडीसीने यापूर्वी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रासह इतरही काही राज्यात विषाणूच्या नव्या प्रकाराचा संसर्ग वाढतोय असे लक्षात आले आहे, त्यामुळे ही काळजी घेणे गरजेचे आहे, असं केंद्रीय आरोग्य विभागाच्या या पत्रात म्हटले आहे.

टेस्ट, ट्रॅक, ट्रीट वर भर

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राने आणि देशानेही संसर्ग रोखण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे टेस्ट, ट्रॅक, ट्रीट वर भर देणे तसेच कोविड संदर्भातील सर्व आरोग्याचे नियम याचे पालन कटाक्षाने होईल हे पाहणे गरजेचे आहे, असेही या पत्रात म्हटले आहे.

आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे वेळोवेळी सूचना देत असतात. राज्य शासनाने यापूर्वीच यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, आणि आता केंद्रीय आरोग्य विभागाने देखील या उत्सवांमध्ये काळजी घेण्याची गरज असल्याचे सांगून त्याला दुजोरा दिला आहे. आज आपण जनतेच्या जीवाला जास्त महत्व देणे गरजेचे आहे हे यातून अधोरेखित होते आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वांनी आरोग्याच्या नियमांचे कसोशीने पालन करणे गरजेचे आहे. तसेच राज्य शासन वेळोवेळी यासंदर्भात ज्या सूचना देईल ते जनतेच्या हिताचेच असल्याने राजकीय, सामाजिक, आणि सर्व थरांतील लोकांनी कृपया सहकार्य करावे, असं आवाहन परत एकदा केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पत्रकार व डाॅक्टर यांच्यावरील होणारे हल्ले हे समाज स्वास्थ बिघडविणारे आहेत –  कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

News Desk

पूजा चव्हाण प्रकरणाची अवस्था ‘नो वन किल्ड जेसिका’ या चित्रपटासारखी होईल ! । फडणवीस

News Desk

पश्चिम वाहिनी नद्यांचे वाहून जाणारे पाणी मराठवाड्यात वळविण्याचे काम यावर्षी सुरु करण्यासाठी प्रयत्नशील! – उपमुख्यमंत्री

Aprna