HW News Marathi
महाराष्ट्र

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो – प्रविण दरेकर

मुंबई | दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनावरुन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आमने-सामने आले आहेत. दिल्लीत जे आंदोलन पेटलंय ते शेतकरी नाहीतच, असा दावा करणाऱ्या दरेकरांच्या वक्तव्याचा शरद पवार यांनी जोरदार समाचार घेतला. प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे, असं पवार म्हणाले. पवारांच्या टीकेला आता पुन्हा एकदा प्रवीण दरेकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याची पवार साहेबांनी दखल घेणं, हे माझं स्वतःचं भाग्य समजतो. वर्षभर महाराष्ट्र अडचणीत असताना राज्य सरकार राजकारण करत होतं, परंतु त्याकाळात विरोधी पक्षनेता म्हणून विधायक दृष्टीने मी काम केलं”, असं दरेकर म्हणाले आहेत.

“वस्तूस्थिती मांडणं हा काय दोष आहे का? शेतकरी मोर्चात भेंडी बाजारमधील भगिनी कशा? हे केवळ एक उदाहरण म्हणून मी सांगितलं. मी आधार असलेलं वक्तव्य केलेलं आहे, कोणाच्या सांगण्यावरून बोललो नाही”.

काय म्हणाले होते शरद पवार?

शेतकरी आंदोलनावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले वक्तव्य ऐकून आता मला लाज वाटायला लागली आहे. कारण, एकेकाळी मीदेखील विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

आझाद मैदानावरील मोर्चासाठी शेतकरी एवढ्या लांबवरुन चालत आले होते. त्यांचे पाय सुजले होते, फोड आले होते. पण ते एका तडफेने आझाद मैदानावर पोहोचले होते. अशावेळी विरोधी पक्षनेत्याने खरंतर या शेतकऱ्यांची भेट घ्यायला हवी होती.

मात्र, विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेत्याने अशाप्रकारचे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. एकेकाळी मी विधानपरिषदेचा विरोधी पक्षनेता होतो, याची मला आता लाज वाटत असल्याचे शरद पवार यांनी म्हटले होतेे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहर सोडून जाऊ नका ,शहरांवर बाॅम्ब पडलेला नाही !

Arati More

केंद्र सरकार आणि आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांमध्ये गडकरी यांनी तोडगा काढावा – नितिन राऊत

News Desk

किरीट सोमय्या अटकेत, अलिबाग पोलिसांची कारवाई

News Desk