HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री लवकर बरे व्हावे म्हणुन चंद्रकांत खैरेंचं ग्रामदैवताला साकडे!

औरंगाबाद। राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबईतील रिलायन्सच्या हरकिशनदास रुग्णालयात दाखल झाले आहेत. आणि त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आता औरंगाबादचे माजी खासदार आणि शिवसेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी शहराचे ग्रामदैवत असलेल्या खडकेश्वर मंदिरात महादेवाला अभिषेक केला. मुख्यमंत्री लवकरात लवकर बरे व्हावे, असं साकडं चंद्रकांत खैरे यांनी ग्रामदेवतेला घातलं. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले हेदेखील उपस्थित होते.

शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांना मान आणि मण्याच्या दुखण्यामुळे त्रस्त होतं. यानंतर मुख्यमंत्र्यांना काल (११ नोव्हेंबर) गिरगावातील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल झाले होते. आज (१२ नोव्हेंबर) सकाळी मुख्यमंत्र्यांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.दिवाळीपुर्वी उद्धव ठाकरेंना पाठ तसेच मानदुखीचा मोठा त्रास होत होता, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अनेक कार्यक्रमदेखील रद्द केली होती. ठाकरेंनी गिरगावच्या रिलायन्स फाउंडेशन या रुग्णालयात आपली तपासणी केली असून, त्यांच्या मणक्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सकाळी ७:३० वाजता HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया सुरू झाली. वरिष्ठ ऑर्थो सर्जन डॉक्टरांच्या टीमने सुमारे तासभर ही शस्त्रक्रिया केली. सकाळी ८:४५ वाजता डॉक्टरांची टीम ऑपरेशन करून बाहेर आली आणि त्यांनी ऑपरेशन यशश्वी झाल्याचं सांगितलं. सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑपरेशन थिएटर मध्येच आहेत. पुढील काही वेळ ते भूल दिल्यामुळे विश्रांती घेतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा, विधानपरिषदेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

Aprna

साप चावून मेले ८७७ विद्यार्थी

News Desk

शरद पवारांचा ‘ईडी’च्या कार्यालयात जाण्याचा निर्णय तहकूब

News Desk