HW News Marathi
महाराष्ट्र

कृष्णकुंज वर ठाकरे आणि पाटलांची ग्रेट भेट !

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(६ ऑगस्ट) कृष्णकुंज वर भेट झाली आहे. भाजप- मनसे युतीच्या चारच्या रंगात आहेत. यातच भर म्हणजे चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरेंच्या वाढत्या गाठी भेटी. राजकीय वर्तुळात या भेटींमुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. नेमकं काय कारण आहे या भेटींमागचं हे पाहणं महत्वाचं असेल.

जय आहे भेटीचं कारण?

चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची आज(६ ऑगस्ट) राज ठाकरेंच्या राहत्या घरी कृष्णकुंजवर भेट झाली आहे. भाजपने जरी मनसेसोबत युती नाकारली असली तरी या वाढत्या भेटींचे संकेत तर युतीचेच नाही का! भाजप-मनसे युतीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर असेही सांगितले जात आहे की, भाजपा हा राष्ट्रीय पक्ष असून राज्यातील जनतेच्या अधिकारांचे रक्षण व स्वाभिमान जपताना परप्रांतीयांवर अन्यायाची मनसेची भूमिका मात्र भाजपाला मान्य नाही. मनसेने परप्रांतीयांना विरोधाची भूमिका बाजूला ठेवली, तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती होण्याचे शक्यता दिसत आहे.

भेटीआधीच मोठा खुलासा

भारतीय जनता पार्टीचे महाष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. मात्र त्यापूर्वी या भेटीसंदर्भात बोलताना पाटील यांनी मनसे आणि भाजपाची युती होण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. मात्र त्याचवेळी पाटील यांनी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट का घेतली यासंदर्भातही खुलासा केला आहे. भाजपा आणि मनसेची युती होण्याची शक्यता नाहीय. यामागील मुख्य कारण म्हणजे मनसेचे इतर राज्यांबद्दलचे विचार आम्हाला मान्य नाहीत. मात्र मतभेद असले तरी एकमेकांच्या भेटीगाठी घेणं महत्वाचं असतं म्हणून मी उद्या राज ठाकरेंची भेट घेणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी स्पष्ट केलं. त्यामुळेच आज राज ठाकरेंसोबत होणाऱ्या भेटीमध्ये भाजपा आणि मनसेदरम्यानच्या युतीबद्दल चर्चा होणार असल्याचे स्पष्ट संकेत पाटील यांनी दिले आहेत. चंद्रकांत पाटील आज सकाळी साडेअकरा वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. ही सदिच्छा भेट असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. भाजप-मनसे युतीची चर्चा गेले काही दिवस होत असून पाटील व राज ठाकरे यांच्यात प्राथमिक चर्चा झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचे रणनीतीकार आणि चाणक्य… प्रमोद महाजन!

swarit

सांगलीपेक्षा पूरग्रस्तांना लवकरच मदत देण्यात आली, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk

सहकारी बॅंका वाचवण्यासाठी शरद पवारांचे मोदींच्या पत्र

News Desk