HW News Marathi
महाराष्ट्र

कोथरुड मध्ये चंद्रकांत पाटील अपघातातून बचावले!

पुणे। कोथरुड येथील चांदणी चौक येथील कामाची पाहणी बुधवारी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तसेच कोथरुडचे आमदार चंद्रांकत पाटील यांनी केली. मात्र यावेळी झालेल्या एका अपघातामधून चंद्रकांत पाटील अगदी बचावले. चांदणी चौक येथील उतारावर माध्यमांशी संवाद सुरु असतानाच तीव्र उतारावरुन येणाऱ्या एका चालकाची दुचाकी तेथे जमा झालेल्या गर्दीवर आदळली. यावेळी चंद्रकांत पाटीलही तेथे उपस्थित होते.

दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन

सुदैवाने कार्यकर्ते आजूबाजूला असल्याने चंद्रकांत पाटील यांना काही झालं नाही. दुचाकीस्वाराने मद्यपान केल्याच्या शंकेवरुन कार्यकर्त्यांनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. मात्र त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना थांबवलं. “थांबा त्याला मारु नका,” असं म्हणथ चंद्रकांत पाटलांनी कार्यकर्त्यांना थांबवलं आणि त्यांनी दुचाकीस्वाराची चौकशी केली. तुला लागलं नाही ना असं चंद्रकांत पाटील यांनी दुचाकीस्वाराला विचारलं. चंद्रकांत पाटलांच्या मध्यस्थीनंतर कार्यकर्त्यांनी दुचाकीस्वाराला तेथून जाऊ दिलं. हा सर्व प्रकार बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाची पोलखोल स्पर्धा

पुणे महापालिकेत २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भाजपाच्या हाती सत्ता दिली. मात्र मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून कोणत्याही योजना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यात अपयश आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय. कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही, दांडेकर पूल येथे कालवा फुटीची घटना, शहरात अनेक भागात खड्डे, यासारख्या समस्या आहेत असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसारख्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत समस्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झालं आहे. यासह अनेक प्रश्नावर अनेक वेळा सभागृहात किंवा बाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले आहे. आता तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाची पोलखोल स्पर्धा जाहीर केली आहे.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तू बोलतो किती? तुझी औकात किती? तू आहेस केवढा?”, अमोल मिटकरींचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला

News Desk

आता तरी राज्यातील चाचण्या वाढवा, फडणवीसांची मुख्यमंत्र्यांना पत्रातून विनंती

News Desk

सैन्यदलाच्या अवमानाबद्दल मोहन भागवत यांनी तात्काळ माफी मागावी : खा. अशोक चव्हाण

News Desk