HW News Marathi
महाराष्ट्र

कोरोना संसर्गविरोधात कोथरूडमध्ये निर्जंतुकीकरणचा चंद्रकांत पाटील यांचा उपक्रम

पुणे | कोरोना संसर्गाच्या विरोधात कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकार घेत सर्वंकष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे अंतर्गत विविध वाड्या-वस्त्या, सोसायटी मध्ये निर्जंतुकीकरण औषधांची फवारणी, गरजू व बाहेरगावचे मजूर, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक यांना सवलतीच्या दरात भोजन वाटप आणि औषध वाटप केले जात आहे. त्याचप्रमाणे वृद्ध नागरिक आणि गरजवंतांना औषध व वैद्यकीय सुविधांचा देखील पुरवठा केला जात आहे. या सर्व उपक्रमांवर चंद्रकांत पाटील स्वतः कोथरूडमध्ये उपस्थित राहून लक्ष देत आहेत.

एरंडवणे येथील सात चाळ वसाहत येथे आज (२८ मार्च) हा उपक्रम राबविले. यावेळी नगरसेवक दीपक पोटे व जयंत भावे यांच्यासह भाजप कोथरूड विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष पुनीत जोशी आदी भाजप नेते उपस्थित होते. सर्व मतदारसंघात टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी होत आहे. राज्याती कोरोनाशी लढण्यासाठी सत्ताधाऱ्यांसह विरोधकही एकवटल्याचे चित्र यावून दिली आले आहे. तसेच यानंतर चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमध्ये पाच रुपयात पोळीभाजी केंद्र सुरु केले असून याचा सर्वात जास्त फायदा कोथरुड मधील बॅचलर तरुण आणि विद्यार्थ्यांना मिळत आहे. मात्र, यानंतरही विद्यार्थ्यांनी पोळीभाजी केंद्रबद्दल फेसबुक पोस्ट लिहून या सुविधेबद्दल आभार मानले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अंजली दमानिया देणार छगन भूजबळांच्या सुटकेविरोधात हायकोर्टात आव्हान!

News Desk

Axis बँकेवर ठाकरे सरकारची कृपा, अमृता फडणवीसांवर करत होते टीका

News Desk

महाराष्ट्रात ‘म्हाडा’तर्फे येत्या आर्थिक वर्षात १२७२४ सदनिका बांधण्याचे प्रस्तावित

Aprna