HW News Marathi
महाराष्ट्र

“मंदिरांच्या ऐवजी बार उघडे, कल्चरची वाट”, चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला टोला

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारला मंदिरांवरून टोला लगावला आहे. राज्य सरकारने मंदिरं बंद ठेऊन दारूची दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय दिलं आहे. ‘ संतांच्या या भूमीवर दारूची दुकानं मंदिरां ऐवजी चालू ठेऊन सरकारने कल्चरची वाट लावली आहे’, असा टोला चंद्रकांत पाटलांनी ठाकरे सरकारला लगावला आहे.

मनसे सोबत युती नाही

चंद्रकांत पाटील यांनी आज(१० ऑगस्ट) पत्रकार परिषद घेतली होती. यात ते बोलत होते. राज ठाकरें सोबत झालेल्या भेटीवरून प्रश्न विचारला असता त्यांनी ‘युती होणार नाही’ असा स्पष्ट मत दिलं आहे. ” पक्षश्रेठींच्या आणि भाजपच्या इतर मोठ्या नेत्यांच्या कानावर मी भेटीची गोष्ट लगेच सांगितली होती. आमची भेट राजकीय नसून ती निव्वळ मैत्री पोटी होती आणि त्यातून कोणताही राजकीय अर्थ निघत नाही. पक्षातील नेत्यांना या भेटीबद्दल सांगून त्यात मनसे सोबत युतीचा प्रस्ताव नाही हे देखील सांगितलं”, असा चंद्रकांत पाटील म्हणाले.

दिल्लीला जाण्याचं कारण काय?

भाजप नेत्यांची दिल्लीत भेट झाली असून या भेटीमुळे अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. चंद्रकांत पाटलांनी या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे. ” भाजपची ही प्रथा आहे की सगळे खासदार एका मोठ्या खासदाराच्या घरी जाऊन भेटून महाराष्ट्रातल्या घडामोडींचा आढावा घेतात. या भेटीमागचं कारण राजकीय न्हवतं. भाजप नेत्यांनी केंद्रात निवड झालेल्या सगळ्या नेत्यांचं स्वागत केलं आणि त्यांचं कौतुक देखील केलं.”

” दिल्लीत ज्या नेत्यांची निवड झाली आहे, त्यांचा फायदा महाराष्ट्रातल्या कोणत्या कामांसाठी करतं येईल यावर देखील चर्चा झाली आहे. नवीन मंत्र्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. गेल्या २ वर्षात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या भेटी होऊ शकल्या न्हवत्या परंतु आता पुन्हा या भेटी चालू होतील”, अशी माहित चंद्रकांत पाटलांनी दिली आहे.

मोदी- शाह भेटले नाही कारण….

“दिल्लीत भाजपच्या सगळ्या नेत्यांशी भेट झाली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट होऊ शकली नाही कारण त्यांच्याशी काही काम न्हवतं. या भेटी १५ दिवस आधीच ठरल्या होत्या आणि त्या संबंधात पत्रं देखील दिल्लीला गेली होती. ही भेट राजकीय नसून नवीन मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी होती, या सगळ्यात मोदी आणि शाहंचं काही काम नसल्याने त्यांची भेट घेतली गेली नाही”, चंद्रकांत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण. राज ठाकरेंच्या भेटीमुळे पक्षातले नाराज आहेत असं विचारला असता, ” जर माझ्यावर पक्षातले नाराज असते तर त्यांची आणि माझी भेट झालीच नसती, ते माझ्यावर नाराज नाही म्हणून आम्ही व्यवस्थित भेटलो आणि शुभेच्छा दिल्या आहते”, म्हणले चंद्रकांत पाटील.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कास्टिंग काऊच करणाऱ्यांना अटकेची मागणी’, तर राज ठाकरेंनी केलं ‘त्या’ तरुणींचं कौतुक!

News Desk

पर्यटकांच्या सोयीसाठी ‘गेट वे ऑफ इंडिया’ परिसर आकर्षक करणार! – आदित्य ठाकरे

News Desk

‘साहेब आम्ही तुमच्या सदैव सोबत’, अनिल परबांच्या समर्थनासाठी शिवसैनिक पुढे सरसावले!

News Desk