पुणे | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे अखेर भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित आहे असे बोलले जात आहे. २२ ऑक्टोबरला ते राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे म्हटले जात आहे. यावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाही, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांची मनधरणी सुरु आहे,” असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. “नाथाभाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. पक्षाचं नुकसान होईल असं ते वागणार नाहीत. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते पुन्हा सक्रिय होतील. त्यामुळे इतरांचा हिरमोड होईल,” अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.
तसेच, मुख्यमंत्र्यांच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्याच्या दौऱ्यावरुनही त्यांनी टीका केली आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेऊ शकतात. त्यांनी धावता प्रवास करण्याची गरज नाही. कोरड्या प्रवासातून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यांनी शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा. पंचनामे करण्याचीही गरज नाही,” असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. “प्रत्येक वेळी केंद्र केंद्र करायचं नसतं. आपत्तीच्या वेळी पहिली मदत राज्य सरकारने करायची असते. नंतर केंद्राकडे मदत मागायची असते. राज्य सरकारने आधी मदत घोषित करावी, केंद्राकडून जे मिळेल ते बोनस समजायचं,” असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.