HW News Marathi
महाराष्ट्र

राज ठाकरे चंद्रकांत पाटलांना म्हणाले,’पुन्हा या’

मुंबई | भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज(६ ऑगस्ट) राज ठाकरेंच्या राहत्या घरी भेट झाली. या भेटीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरेंनी पुन्हा आमंत्रण देण्याचं सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा या दोघांची भेट होण्याची शक्यता आहे. तसंच महानगपालिका निवडणुकीत संजय राऊत यांनी निवडून दाखवावंच अशीही टीका यावेळी चंद्रकांत पाटलांनी केली आहे.

ते म्हणाले पुन्हा या…

राज ठाकरेंशी चर्चा झाल्यावर चंद्रकांत पाटलांनी पुन्हा भेटण्याचे संकेत दिले आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले,” जेव्हा दोन भारतीय भेटतात तेव्हा ते चहा पाणी झाल्यावर पुन्हा येण्याचं आमंत्रण देतात. असंच आमंत्रण राज ठाकरेंनी मला दिलं आहे. मीही त्यांना माझ्या घरी चहासाठी निमंत्रण देतो. या सगळ्यात कोणताही राजकीय हेतू न्हवता फक्त आमच्या आवडीनिवडी आणि स्वभावावरून चर्चा करण्यात आली आहे.”

संजय राऊतांनी निवडून दाखवावं

महानगरपालिका निवडणुकांवर प्रश्न विचारला असता ते म्हणाले कि, ” संजय राऊतांनी सेफ जागा शोधून स्वतः निवडून दाखवावं. अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या निवडणुका लढवण्यासाठी सज्ज आहे म्हण्या पेक्षा त्यांनी त्यांची क्षमता आणि दंड तपासून पाहावेत”, असा टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ड्रायपोर्ट, सॅटेलाईट पोर्ट, एअरपोर्टमुळे सांगलीचा चौफेर विकास होणार! –  नितीन गडकरी

Aprna

ठरलं ! MPSC परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

News Desk

फोन टॅपिंगचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाला सादर, अनेकांचे बिंग फुटणार – देवेंद्र फडणवीस

News Desk