HW News Marathi
महाराष्ट्र

संजय राऊत चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात – चंद्रकांत पाटील

मुंबई | राज्यातील राजकरणात अलीकडे अनेक घटना घडताना दिसत आहेत. यावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत रोकठोकपणे भाष्य करताना दिसतात. यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे.शरद पवारांनी यूपीएचं नेतृत्व करण्याबाबत संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसोबत अनेक नेत्यांनी संजय राऊतांवर टीका केली. यादरम्यान पंढरपूर-मंगळवेढाच्या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचा अर्ज भरण्यासाठी गेलेल्या चंद्रकांत पाटील यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटलांनी संजय राऊतांचा जोरदार समाचार घेतला आहे.

संबंधित प्रकरणाबाबत आपण उत्तर देणं बरोबर नसून संजय राऊत हे चंद्रावर, सुर्यावर, मंगळावर कशावरही भाष्य करु शकतात, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर मी एक सामान्य माणूस आहे आणि त्यांनी काय म्हटलंय यावर आपण प्रतिक्रीया देणं बरोबर नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी यावेळी बोलताना नांदेडमधील पोलिसांवर झालेल्या हल्ल्यावर देखील भाष्य केलं. आम्ही पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन कधीच करणार नाही. मात्र हा असंतोष तेथील नागरिकांमध्ये का निर्माण झाला?, याचा विचार ठाकरे सरकारने करावा, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाऊद्या आणि समाजाला वस्तुस्थिती काय आहे हे कळू द्या! – अजित पवार

Aprna

जेव्हा राज ठाकरेंचे सरकार येईल तेव्हा…संदीप देशपांडेंचा इशारा

News Desk

प्रगती का हायवे! महाराष्ट्रातील रस्ते बांधणासाठी २,७८० कोटी मंजूर

News Desk