मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे-पाटील यांची गृहमंत्रीपदी वर्णी लागली आहे. वळेस पाटलांनी पदभार हाती घेतल्यानंतर पोलीस प्रशासनातील ‘संघ’निष्ठ अधिकाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला आहे. यावरून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“नुकतेच राज्याचे गृहमंत्री झालेले दिलीप वळसे पाटील हे माझे चांगले मित्र आहेत. परंतु माझं म्हणणं आहे की त्यांना बळीचा बकरा केला आहे. त्यांची अॅन्जीओप्लास्टी झालेली आहे. त्यामुळे ज्या प्रकारे गृहखात्यामध्ये आगामी काळात त्यांना भूमिका बजवावी लागणार आहे, हे ते कसं सहन करू शकतील हा प्रश्न आहे. मात्र हा त्यांच्या पक्षाचा व त्यांचा वैयक्तिक विषय आहे, मैत्री वेगळी व पक्ष वेगळा,” असं म्हणत टोलाही लगावला होता.
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? गुन्हेगारी संघटना आहे? आता पर्यंत देशातील सगळ्या अडचणींमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशासाठी लढला, झिजला हे सांगायला तुम्ही लागत नाही दिलीप वळसे पाटील. हे सर्वसामान्यांना माहीत आहे त्यामुळे, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मधे आणू नका.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तसेच, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या विधानाबाबतही चंद्रकांत पाटील म्हणाले, “दिलीप वळेस पाटील यांनी असं म्हटलं आहे की कोण कोण अधिकारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबधित आहेत, हे आम्ही शोधून काढू. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? गुन्हेगारी संघटना आहे? गांधींच्या हत्येच्याबाबत देखील सर्व न्यायालयाने निकाल दिला की संघाचा गांधींच्या हत्येत हात नाही. त्यावेळी तर तुमचीच सरकारं होती”, असं म्हणत हल्ला केला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही दहशतवादी संघटना आहे? गुन्हेगारी संघटना आहे? आता पर्यंत देशातील सगळ्या अडचणींमध्ये @RSSorg देशासाठी लढला, झिजला हे सांगायला तुम्ही लागत नाही @Dwalsepatil. हे सर्वसामान्यांना माहीत आहे त्यामुळे, तुमच्या राजकीय स्वार्थासाठी संघाला मधे आणू नका. pic.twitter.com/Yn73gDhXen
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 12, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.