HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हा दाखल केला पाहीजे, भाजपची मागणी

नागपूर | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. मुंबई, पुण्यासह नागपूरही कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट बनलं आहे. विरोधक आक्रमक होताना दिसत आहे. दरम्यान, अशा स्थितीत राज्य सरकार विदर्भातील ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष करत असल्याची टीका भाजप नेते  चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. नागपूरात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी महाविकास आघाडी सरकाराच्या अपयशाबद्दल टीका केली आहे. तसेच सरकार कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत असून ते पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जास्त रस दाखवत आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हे दाखल करायला पाहिजे

महाराष्ट्रात कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात असताना सरकार मात्र पंढरपूरच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात गुंग आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारआणि जयंत पाटील हे हजारोंच्या बैठका घेत आहेत. अशा बैठकांमुळे कोरोना विषाणू सुपर स्प्रेडर बनत आहे. पण याकडे सरकारातील नेत्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे. त्यामुळे हजारोंची गर्दी करणाऱ्या अजित पवार आणि जयंत पाटलांवर गुन्हे दाखल करायला पाहिजेत, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दरम्यान, अजित पवारांनी पंढरपूरात घेतलेल्या त्या सभेत ८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

…तर आम्हीही असंच वागू, बावनकुळेंचा इशारा

कोरोना विषाणूचं कारण सांगून विरोधकांना आंदोलन करण्यापासून रोखलं जातंय. तसेच त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली जात आहे. जर सरकारने याकडे लक्ष दिलं नाही, तर आम्हीही असंच वागू असा इशाराही भाजप नेते बावनकुळे यांनी दिला आहे. उद्धव ठाकरे यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे. कारण ग्रामीण भागातील जनता चिडली आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर ग्रामीण भागातील लोकं रस्त्यावर उतरतील. वीज प्रश्नावरही ठोस निर्णय घेतला नाही, तर आम्ही १० हजार लोकांना घेऊन रस्त्यावर उतरून आणि वास्तव मांडू असा इशाराही बावनकुळे यांनी दिला आहे. सरकारने ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केल्यानं गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या केंद्रसरकारची एक टीम राज्यात फिरत आहे,  पण महाराष्ट्र सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे, असंही बावनकुळे यावेळी म्हणाले.

Related posts

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन नाशिकहून नेण्यास केंद्राचा नकार

News Desk

संजय राठोडांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यभर ‘चक्काजाम’ आंदोलन

News Desk

पावसाळा लक्षात घेत छत्री, रेनकोट यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत समावेश

News Desk