HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांनी ‘मराठा समाजासोबत आहोत’ हा विश्वास द्यावा !

मुंबई | “मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवशी आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास द्यावा. मराठा समाज उद्धव ठाकरेंना आशीर्वादच देईल”, असे विधान ‘शिवसंग्राम’चे अध्यक्ष विनायक मेटे यांनी केले आहे. “मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शिवसंग्राम पक्ष आणि इतर संघटना प्रयत्न करत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हे आरक्षण टिकवण्याचे प्रयत्न केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जर आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास दिला तर मराठा समाज त्यांना आशीर्वादच देईल”, असे विधान विनायक मेटे यांनी केले आहे.

“मुख्यमंत्र्यांनी आपल्या वाढदिवशी आपण मराठा समाजासोबत आहोत हा विश्वास द्यावा. काही लोक समाजात दुही माजवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेले. सर्वोच्च न्यायालयातील या सुनावणीचा राज्यातील कोट्यवधी लोकांवर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे, या निकालाचा परिणाम दूरगामी असणार आहे. त्यामुळे, ही सुनावणी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होता कामा नये, अशी आमची सुरुवातीपासूनची मागणी आहे. राज्य सरकारने देखील याच मागणीवर ठाम राहावे”, असेही विनायक मेटे यावेळी म्हणाले.

राज्यात २ नव्हे तर ३ मुख्यमंत्री !

“राज्यात एकूण ३ मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे नावाला मुख्यमंत्री आहेत. तर मंत्रालयातून बसून काम करणारे अजित पवार दुसरे आणि शरद पवार हे सुप्रीम मुख्यमंत्री आहेत”, अशी टीका देखील यावेळी विनायक मेटे यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे पंतप्रधानांना पत्र, शेतीक्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची केली मागणी

News Desk

कोरोनाच्या नव्या रुपामुळे धास्तावलेल्या ब्रिटनला दिलासा, कोरोनाच्या लशीला दिली मंजुरी 

News Desk

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माहितीचे संरक्षण, चांगले इंटरनेट नेटवर्क यांच्या पूर्ततेचे आव्हान

News Desk