HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांची राज्यातील सर्वपक्षीय राजकीय नेत्यांसमवेत बैठक

मुंबई | महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १६ हजार ७५८ झाली आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (७ मे) मंत्रालयात महाविकासआघाडीच्या नेत्यांसह विरोधकांची सर्वपक्षीय बैठक  बोलवण्यात आली होती.

संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन असूनदेखील कोरोनाबाधितांची संख्येत वाढताना दिसत आहे. त्यात मुंबईतील रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना रुग्णांची वाढती संख्या, उपाययोजना आणि लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या शिथीलतेच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी  सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

या बैठकीत महाविकासआघाडीच्या नेत्यांसह विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यसह सर्वपक्षीय अध्यक्ष आणि महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित आहेत. यात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील आदी नेतेमंडळी उपस्थिती होते.

 

 

Related posts

कोरेगाव-भीमा तपास एनआयएकडे सोपविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर शरद पवार नाराज

News Desk

लवासा प्रकरणात शरद पवारांसाठी केवळ ‘त्या’ कायद्यात केली सुधारणा, याचिकाकर्त्याचा आरोप

News Desk

“छोट्या छोट्या गोष्टींवर बोलणारे आता गृहमंत्री कुठे आहेत?”

News Desk