नवी दिल्ली। सत्ताधारी मोदी सरकार विरोधात प्रथमच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधक एकत्र येत आक्रमक पवित्रा पहायला मिळाला. संसदेत विरोधी पक्षांनी एकत्र आल्यावर आता ही एकजुट कायम राखत भाजपला घेरण्यासाठी काँग्रेस पक्षाने रणनिती आखली आहे. काँग्रेसची विचारधारा आणि यूपीएतील घटक पक्ष तसेच समविचारी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांसोबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बैठक घेणार आहेत. या बैठकीत काँग्रेस प्रणित राज्य सरकारचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित
येत्या 20 ऑगस्ट रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत समविचारी विरोधी पक्षांचे नेते, भाजप विरोधी पक्षांचे नेते, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुद्धा बैठकीत उपस्थित असणार आहेत.
The security marshals were called in yesterday during the passage of the insurance amendment bill to privatise general insurance companies in the Rajya Sabha. Do you want to scare us? Today we will be meeting in Kharge Ji's chamber and decide what to do: Shiv Sena MP Sanjay Raut pic.twitter.com/TuvS3ErkKO
— ANI (@ANI) August 12, 2021
मोदी सरकारला धारेवर धरणार
विरोधकांच्या गदारोळात यंदाच्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भाजप प्रथमच बॅकफूटवर गेल्याचं दिसून आलं. यावेळी काँग्रेस पक्षाला इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांची चांगली साथ मिळाली. विरोधी पक्षांची ही एकजूट कायम ठेवत आता काँग्रेस मोदी सरकारला धारेवर धरणार असल्याचं दिसत आहे.शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं की 20 ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी काँग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थित राहणार आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.