HW News Marathi
महाराष्ट्र

‘तो’ मायचा पूत अजून जन्माला आला नाहीय!; उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई । ‘दसरा’ आला की राजकीय वर्तुळाचं संपूर्ण लक्ष असतं ते शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे. विशेषतः महाविकासआघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना कायमच विरोधकांच्या टीकेची धनी राहिली आहे. या सगळ्या टिकांना तोडीस तोड उत्तर देण्याचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे शिवसेनेचा दसरा मेळावा. त्यामुळे, यंदाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची ठाकरी तोफ कोणावर धडाडणार याकडेच सर्वांचं लक्षात होतं. अखेर उद्धव ठाकरेंनी विरोधकांना इशारा दिला आहे. “ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा असा मायचा पूत जन्माला आलेला नाही. त्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू”, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या दसरा मेळाव्यात विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे. “ठाकरे कुटुंबावर हल्ले करणाऱ्याला तिथल्या तिथे ठेचून टाकू”, असं म्हणत उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “पदं येतील आणि जातील, सत्ता येईल आणि जाईल पण तुझ्या डोक्यात अहंपणा जाऊ देऊ नको ही शिकवण मला माझ्या आजोबांनी आणि वडिलांनी दिली आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे.

मला कधीही असं वाटू नये की मीच मुख्यमंत्री! फडणवीसांवर निशाणा

उद्धव ठाकरे यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. “सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पूजा केली. आपल्यावर फुलं उधळली. तुम्ही माझी खरी शस्त्र आहात. हे आशीर्वाद असताना माझ्या मनात नेहमी नम्रतेची भावना असते. मला वाटतं की प्रत्येक जन्मी मला हेच आई-वडील, कुटुंब-परिवार मिळायला हवा. महाराष्ट्रातच जन्म व्हायला हवा आणि मला स्वत:ला कधीही असं वाटू नये की मीच मुख्यमंत्री आहे”, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाथाभाऊ शेवाळे यांचा नाथा या पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ठरला ऐतिहासिक क्षण

News Desk

सारथी ही ‘स्वायत्त’ संस्था म्हणून टिकली पाहिजे, संभाजीराजे यांची उपमुखमंत्र्यांकडे मागणी

News Desk

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार यापुढे केवळ बीएस-IV मानकांच्या वाहनांचीच नोंदणी होणार

News Desk