Chief Minister Uddhav Balasaheb Thackeray hoisted the National Flag at his official residence Varsha on the occasion of Independence Day. pic.twitter.com/ktJMohxeKW
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 15, 2020
“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे”, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (१४ ऑगस्ट) आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. राज्यातील राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर झालेल्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे. “तुम्ही महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे”, असेही मुख्यमंत्री काल म्हणाले होते.
“महाराष्ट्र पोलीस आम्हाला तुमचा अभिमान आहे. या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी महाराष्ट्र पोलिसांचे “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” ब्रीद उंचावणारी कामगिरी केली आहे. या कामगिरीसाठी सर्वांना सलाम, आणि जाहीर पुरस्कारासाठी या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील ५८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. यात उत्कृष्ट सेवेकरिता ५ ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, १४ पोलीस शौर्य पदक आणि प्रशंसनीय सेवेकरिता ३९ ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी या सर्वांचेच कौतुक केले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.