HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी घेतलेला निर्णय केला रद्द …

मुंबई | महाविकासआघाडीमधील असमन्वय आणि मत भिन्नता पुन्हा एकदा समोर आला आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या ४ दिवसात रद्द करण्याचा अजब कारभार महाविकासआघाडीने करून दाखवला आहे. २ जुलै रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबईतील १० पोलीस उपायुक्तांच्या बदल्या केल्या. मात्र ४ दिवसातच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या रद्द केल्या आहेत. यामुळे सरकारमधील मतभेद आणि समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या ज्येष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. त्यानंतर तीनच दिवसांनी मुख्यमंत्र्यांनी या सर्व बदल्या रद्द केल्याने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदल्या करताना मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राज्य सरकार सध्या कोरोनाविरुद्ध लढाई लढत आहे. त्यात पोलिसांची भूमिकाही महत्त्वाची आहे. अशा परिस्थितीत सगळ्यात महत्वाचे मानल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांच्या १० अधिकाऱ्यांच्या बदल्या होणे याला वेगळे महत्त्व आहे. मात्र हा मोठा निर्णय हा परस्पर घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नाराज असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती

महाविकास आघाडी सरकारचे तीन पक्षांचे सरकार चालवताना सरकारमधील हा गोंधळ वारंवार समोर येत आहे. हे सरकार एकमेकांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेत आहेत का असा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. मात्र, जर या सरकारमध्ये असाच असमन्वय दिसला तर याचा फायदा नक्कीच विरोधी पक्षाला होईल असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

तडीपार गुंडाचा मुख्यमंत्र्यांसोबतचा फोटो व्हायरल

News Desk

नगरमध्ये संतप्त ग्रामस्थांचे रास्तारोको

News Desk

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

News Desk