HW News Marathi
Covid-19

मुख्यमंत्र्यांकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा, यंदा सामाजिक भान ठेवून गणेशोत्सव साजरा करु ! 

मुंबई | देशभरात आजपासून (२२ ऑगस्ट) गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मात्र, यंदा एकीकडे बाप्पाच्या आगमनाचा सोहळा साजरा करताना दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जागरूक राहत सर्वांनाच जबाबदारीने देखील वागायचे आहे. याच पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “यंदा कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. तसेच याचा सामना करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना”, अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी श्री गणेश चरणी केली आहे. त्याचप्रमाणे, “कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा”, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

“श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षी प्रमाणे यंदाही करतो आहोत मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बाप्पाकडे केली आहे. गणेश चतुर्थीच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. “कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु”, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची !

“संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी. ही वेळ नियम पाळून उत्सव साजरा करण्याची आहे. श्रीगणेशाचे आगमन असो किंवा विसर्जन असो, प्रत्येकाने कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या घरात, गल्लीत आणि कॉलनीत होणार नाही याची दक्षता घेणे अत्यावश्यक आहे”, असे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला उद्देशून म्हटले आहे. गणेशोत्सव मंडळांच्या सामजिक प्रबोधन आणि आरोग्य शिबिर घेण्याच्या निर्णयाचे स्वागत करत मंडळांनी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध केले तर अधिक सोयीचे होईल असेही मुख्यमंत्री म्हणाले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील आदिवासींना तात्काळ रेशन कार्ड देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

महाराष्ट्रात कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढवले, काय आहेत नवे नियम?

News Desk

अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा शेतकर्‍यांना मदत द्या, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

News Desk