HW News Marathi
महाराष्ट्र

स्मृती इराणी विरोधात हडपसर पोलिसांत तक्रार

पुणे | कलर्स मराठी या वाहिनीवर बीग बॉस मराठी नावाने एक शो प्रसारीत केला जातो. या शो मध्ये असलेले मराठी कलाकार रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपुरे यांचे अश्लील चाळे सुरु असल्यामुळे कुटुंबासोबत बसून हा शो पाहू शकत नाही अशी प्रतिक्रीया अनेकांनी दिली होती. राजेश शृंगारपुरे आणि रेशम टीपणीस यांच्यातील रोमान्स मर्यादांचे उल्लंघन करणारा असल्याने प्रेक्षकांमध्ये त्यांच्याविषयी काहीसा विरोधाचा सूर आवळला जात असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपुर्वी नाशिकमध्ये एनबीटी विधी महाविद्यालयात कायद्याचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याने कलर्स मराठी वाहिनीच्या सर्व संचालकांविरोधातच तक्रार करताना शोदरम्यान, प्रसारित केलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीच्या चौकशीची मागणी केली होती.

या तक्रार प्रकरणानंतर कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाया बिग बॉस मराठी या मालिकेतील प्रसारित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह आणि अश्लील चित्रफितीबाबत पुण्यातील हडपसर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे हे पुर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते या टिकाणी रहाणारे रहिवासी कुमार काळेल यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३४, १२० ब, २९२, २९३, २९४ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा २००० च्या कलम ६७ व ६७ ब अंतर्गत स्मृती इराणी तसेच माहिती व प्रसारण मंत्रालय, कलर्स वाहिनी विरोधात हडपसर येथे तक्रार दाखल केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुंबई, महाराष्ट्रानं अनेक लोकांना धनवान केलंय’, राऊतांचा विरोधकांना टोला

News Desk

कलाकारांवर टीका करतांना तारतम्य बाळगा, दरेकरांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रिया बेर्डेंचा संताप!

News Desk

राष्ट्रवादीने भाजपला सल्ला देण्यापेक्षा राम मंदिराच्या उद्घाटनासाठी गर्दी जमवत असलेल्या नेत्यांना नियंत्रणात आणावे – सुजय विखे

News Desk