HW News Marathi
महाराष्ट्र

अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण, आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल

जेजुरी | जेजुरी अहिल्यादेवी होळकर पुतळा अनावरण करण्याच्या मुद्द्यावरून आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेजुरी पोलिस ठाण्यात गोपीचंद पडळकर यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. जमावबंदी आदेशाचं उल्लंघन, पोलीस कामात अडथळा यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहेत.

काय म्हणाले होते गोपीचंद पडळकर?

शरद पवार यांच्या सारख्या भ्रष्ट आणि जातीयवादी राजकारण्याकडून या पुतळ्याचं उद्घाटन होऊ नये, अहिल्यादेवींचं काम बहुजन आणि इतर सगळ्यांसाठी होतं. त्यामुळे पुतळ्याचा आणि आमच्या भावनांचा अपमान होऊ नये, असं सांगत गनिमी काव्यानं जाऊन गोपीचंद पडळकरांनी त्या पुतळ्याचं अनावरण केलंय आहे. राज्यभरातील शेकडो बहुजन कार्यकर्त्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती होती. तसेच गोपीचंद पडळकर यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी शरद पवारांवर टीका केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोल्हापुरात पंचगंगेने ओलांडली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावातील नागरिकांचे केले स्थलांतर

News Desk

शिवसेनेच्या वाघाचे संवर्धन करणे, ही माझी जबाबदारी, मुनगंटीवार यांची राऊतांवर टीका

News Desk

HW Exclusive : पाण्यासारखा आकार घ्यावा, हीच आईची शिकवण! – रोहित पाटील

Aprna