HW News Marathi
महाराष्ट्र

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

मुंबई | काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे कोरोना संसर्गनंतर उपचारादरम्यान निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कोरोनाशी झुंज देत होते. मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली आहे. पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये राजीव सातव यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ४ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळवणारे राजीव सातव यांना राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट करत राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “काँग्रेस नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती.गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे.

भावपूर्ण श्रद्धांजली!’

अजित पवार, उपमुख्यमंत्री

काँग्रेसचे युवा नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने महाराष्ट्राने, देशाने एक अभ्यासू, कार्यकुशल, आश्वासक नेतृत्व गमावले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचे मित्र आणि विश्वासू सहकारी असलेल्या राजीव सातव यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी जवळिकीचे, मित्रत्वाचे, सौहार्दाचे संबंध होते. राजीव सातव हे भारतीय राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा होते. त्यांच्या निधनाने जगन्मित्र हरपला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

संजय राऊत, शिवसेना खासदार

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अतिशय भावनिक पोस्ट लिहिली आहे. ‘राजीव सातव तु हे काय केलेस? राष्ट्रीय राजकारणात तुझ्याकडून खुप अपेक्षा होत्या..तुझं हे असं जाणं भयंकर वेदनादायक आहे..

चार दिवसापूर्वीच विडिओ काॅलवर आपण निशब्द हाय हॅलो केले..लवकरच बाहेर येण्याची तुझी विजयी मुद्रा माझ्या डोळ्यासमोर आहे..तुला श्रध्दांजली कोणत्या शब्दात वाहू?’, अशी भावनिक पोस्ट राऊत यांनी लिहिली आहे.

चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहिली आहे.महाराष्ट्राचं उदयोन्मुख नेतृत्व ज्यांना राज्याची राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्नांची जाण होती असे खासदार राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनाची बातमी ही अतिशय दुःखद आणि धक्कादायक आहे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक निर्भिड, प्रामाणिक नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या दिवंगत आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली!

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस आयुक्तांची बदली हे आमचं टार्गेट नाहीच !, सरकारच्या निर्णयावर भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया

News Desk

वार्तांकनावर निर्बंध आणणा-या नांदेड मनपाचा निषेध- विजय जोशी

News Desk

पवारांची चप्पल उचलणारे चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका करत आहेत – निलेश राणे

News Desk