मुंबई | आज महाराष्ट्र दिन, आजच्या दिवशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला आणि महाराष्ट्राला आधुनिकरित्या प्रगतशील करण्याचा संकल्प केला. स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र स्मृतीस वंदन करतो. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि माझ्या कामगार बांधवांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिल्या आहेत.
शौर्याचा अथांग सागर आणि कला, साहित्य, संतांच्या विचारांनी सजलेल्या या महाराष्ट्राला नमन🙏
सर्वाना महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !#महाराष्ट्रदिन #maharashtraday #LabourDay pic.twitter.com/qYHM6ddgih— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) May 1, 2020
महाराष्ट्र राज्य दिनी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात नियमीत ध्वजारोहण केले. आज (१ मे) राज्यभर विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्या महाराष्ट्रावर कोरोना व्हायरसच्या संकटाची टांगती तलवार आहे. मात्र महाराष्ट्र हे सक्षम राज्य आहे. अस्मानी सुलतानी संकटांना न डगमगता खंबीरपणे सामोरे जाणे हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. या इतिहासाची पुनरावृत्ती करत आपण कोरोनावर मात करणारच याची मला खात्री आहे.
आज कोरोनाविरोधातील लढ्यात आपले मोलाचे योगदान देणारे डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी, अत्यावश्यक सुविधा पुरवणारा प्रत्येक व्यक्ती आणि सर्वात महत्वाचे म्हणजे संयम ठेवत घरात राहणारे नागरिक यांच्या कर्तृत्वाची नक्कीच इतिहासात नोंद होईल. ही विषाणूच्या विरोधातील एक चळवळ आहे. आपण हा लढा ‘संयुक्त’पणे, सर्व ताकदीने लढण्याचा निश्चय महाराष्ट्र दिनी करूयात.
मला मान्य आहे या संकटापेक्षा मोठे आर्थिक संकट पुढे आपली वाट पाहत आहे. मात्र त्या संकटावरही हा महाराष्ट्र मात करणार याचा मला विश्वास आहे. आपल्यावर आलेले हे संकट उलथून टाकून महाराष्ट्राला आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक या सर्वच क्षेत्रात अव्वल करण्यासाठी आपण सर्वांनीच शपथ घ्यावी.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.