HW News Marathi
महाराष्ट्र

केंद्रातील तुमचं ‘आधळं, बहिरं आणि मुकं’ सरकार आहे – महेश तपासे 

मुंबई | रावसाहेब दानवे तुम्ही आमचं सरकार अमर अकबर अँथनीचे सरकार म्हणताय ते बरोबर आहे कारण या तिन्ही नावात ‘सर्वधर्मसमभाव’ आहे आणि तेच मानणारं महाविकास आघाडीचं सरकार आहे मात्र केंद्रातील तुमचं ‘आधळं बहिरं आणि मुकं’ सरकार असल्याचा प्रतिहल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

देशात वाढलेली बेरोजगारी आणि उध्वस्त झालेली अर्थव्यवस्था दिसत नाही म्हणून आंधळं सरकार आणि अबला… शोषित… पिडीत… मागास लोकांवर भाजपशासित राज्यामध्ये अन्याय, अत्याचार होतात. या शोषित लोकांचे ओरडणं ऐकू येत नाही म्हणून हे बहिरं आहे. या घटनांवर केंद्रातील मंत्री बोलत नाही म्हणून मुकं सरकार आहे असा हल्लाबोल महेश तपासे यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंद…बंद…बंद…महाराष्ट्र बंद – 5 जूनला शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक

News Desk

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चा झाल्याची शक्यता

News Desk

दक्षिण मुंबई वीजपुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करणार! – डॉ.नितीन राऊत

Aprna