HW News Marathi
महाराष्ट्र

नाथाभाऊ काँग्रेसमध्ये आले तर आनंद होईल, पक्षाला बळकटी मिळेल !

मुंबई | “नाथाभाऊ आमचे आवडते व्यक्तिमत्व आहे. भाजपमध्ये त्यांची अहवेलना झाली हे आम्हांला देखील आवडले नाही, अशी माणसे पक्षात अली तर आनंद होईल, पक्षाला बळकटी देखील मिळेल,” अशी अप्रत्यक्ष ऑफर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांना दिली आहे.

थोरात पुढे म्हणाले की, नाथाभाऊ जर पक्षात आले तर आम्हाला आनंद होईल. मात्र, खडसेंकडून आम्हांला प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही देखील प्रस्ताव दिलेला नाही. पंकजा मुंडे चांगले काम करत होत्या, त्यांच्या नाराजी बद्दल मला माहित नाही. “माझ्यावर असाच अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल,” असा इशारा खडसेंनी पक्षला दिला होता.

खडसेंनी काल (९ डिसेंबर) दिल्लीत जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ निवासस्थानी त्यांची भेट घेतली असून त्यानंतर खडसे लगेच मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. खडसे आज (१० डिसेंबर) राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजांनंतर प्रीतम मुंडेंचाही धनंजय मुंडेंवर टीकांचा वर्षाव!

News Desk

“सुनलो हमारी बात…” आमदार बच्चू कडूंचे पावसात सरकारविरोधी आंदोलन

News Desk

पुढचे ४८ तास राज्यासाठी महत्त्वाचे, ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज!

News Desk