HW News Marathi
महाराष्ट्र

अनेकदा जेलवारी केलेले गुजरातचे भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत !

पुणे | विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराचा पारा चढू लागला आहे. गुजरातचे एक भले ‘मोठे’ गृहस्थ महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांनी अनेक महिने महाराष्ट्रच्या तुरुंगातही होते. अनेकदा जेलवारीही केली आहे, अशा शब्दात काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. पवार पुढे म्हणाले की, “भाजपचा कुठलाही नेता इथे आला की माझे नाव घेतात. मला वाटतं की झोपेत होता माझे नाव घेत असतील. मी निवडणूक लढवत नसता न ही त्यांच्या तोंडात सतत माझेच नाव असते. निवडणूक शरद पवार या एका नावावरच ते लढवत आहेत, असे सांगत भाजपच्या नेत्यांवर टीका केली आहे. पवारांनी आज (११ ऑक्टोबर) पुणे जिल्ह्यातील शिरुर मतदारसंघात उरळी कांचन येथील सभेत ते बोलत होते.

तुम्ही मला सांगा गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्रात सांगता. आता काश्मीरमध्ये शेती करणे शक्य आहे. मला सांगा इथले घरदार सोडून काश्मीरात कोण जाणार आहे का शेती करायला? हे मुद्द्याचे बोलतच नाही. महागाईवर बोला, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोला, आत्महत्यांवर बोला, ढासळत्या अर्थव्यवस्थेवर बोला की, पण, यावर न पोलता ते फक्त कलम ३७० बोलतात, असे सवाल उपस्थित करत पवारांनी उपस्थित केले.

“हे गृहस्थ मला विचारतात ३७० वर उत्तर द्या. ही मोठी गंमतीची गोष्ट आहे. सभागृहात माझ्याबद्दल काही नोंद आहे का? मी काही गोंधळ केला का? मग जाब कसला विचारता? यांच्याकडे सांगण्यासाठी काहीच नाही म्हणून कलम ३७०चा मुद्दा पुढे केला जात आहे,” असे पवार म्हणाले. कलम ३७० हटविल्याने आपण काश्मीरमध्ये जमीन विकत शक्य झाले आहे.

कलम ३७० रद्द केले ठिक आहे मग ३७१चे काय ?

भाजप सरकार सतत ३७० कलम रद्द केले त्याचे स्वागतच आहे. आम्ही त्याला कधीच विरोध केला नाही. पण ३७१ कलमाचे काय, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी शिरूरमधील सभेत उपस्थित केला. ३७१ कलमामुळे आमच्याकडील शेतकऱ्यांना नागालँड, मेघालय, मणिपूर अशा ९ राज्यांमध्ये जमिनी विकत घेता येत नाहीत. त्याबद्दल का बोलत नाही, असा प्रश्न त्यांनी केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारला विचारला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

….आणि सुशीलकुमार शिंदेंनी होणारे प्रदेशाध्यक्ष म्हणून नाना पटोलेंचे नाव घेतले

News Desk

पूजा चव्हाणच्या मृत्यूवरुन विरोधकांनी घाणेरडं राजकारण केलं – संजय राठोड

News Desk

महाराष्ट्राचा आकडा १८९५, मुंबईत आढळले आणखी १३४ कोरोना पॉझिटिव्ह

News Desk