HW News Marathi
Covid-19

काँग्रेस पक्ष सातव कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभा ! | राहुल गांधी

मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसने दिवंगत खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. आज (१९ मे) आयोजित केलेल्या या सभेत काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनी राजीव सातव यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यावेळी म्हणाले की, “राजीव सातव यांचे निधन झाले यावर आजही विश्वास बसत नाही. त्यांच्या निधनाने सातव परिवारावर जेवढा मोठा आघात झाला आहे तेवढाच आघात काँग्रेस पक्षावरही झाला आहे. राजीव यांची दोन कुटुंबं होती एक त्यांची आई, पत्नी व मुले आणि दुसरे काँग्रेस पक्ष. राजीवमध्ये एक चमक आहे हे पहिल्याच भेटीत दिसले होते, त्यांनी नेहमी पक्षासाठी उत्तम काम केले. राजकारणात त्यांनी विविध पदांची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. राजीव यांच्या निधनाने मी एक चांगला सहकारी व मित्र गमावला आहे. राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील”, असे राहुल गांधी म्हणाले

राहुल गांधींसह पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी राजीव सातव यांच्याबाबत बोलताना म्हटले की, “राजीव यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे यावर विश्वास बसत नाही. अत्यंत शांत स्वभावाचा, पक्षाशी निष्ठा असणारा, कामाच्या जोरावर पक्षावर विविध भूषवणारे, पक्ष कार्याला प्रथम महत्व देणारे राजीव यांचे एवढ्या कमी वयात निधन होईल असे वाटले नव्हते. ते एक लढवय्या नेता होते. पण कोरोनाविरुद्धची लढाई ते हरले. राजीव यांच्या निधनाने आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याचे दुःख आहे. सातव कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो हीच प्रार्थना”, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत.

राजीव सातव हे उमदे नेतृत्व आणि पक्षाचे भविष्य होते !

राजीव सातव यांच्याविषयी बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, “राजीव सातव हे उमदे नेतृत्व तसेच पक्षाचे भविष्य होते. कोरोनाने त्यांना अकाली हिरावून घेतले. शेतकरी, कामगारांसाठी लढणारा नेता अशी त्यांची ओळख होती. लोकसभेत त्यांच्याबरोबर काम केले. राजीव यांच्या निधनाने पक्षाची व वैयक्तीक मोठी हानी झाली आहे.”

स्वतःच्या मेहनतीच्या बळावर राजीव सातव देशपातळीवर पोहचले !

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण राजीव सातव यांच्याविषयी बोलताना म्हणाले की, “राजीव सातव यांच्याबरोबर संसदेत एकत्र काम केले. ५ वर्ष त्यांनी संसदेत उत्तम काम केले. ते अभ्यासपूर्ण विषय मांडायचे, स्वतःच्या मेहनतीच्या बळावर ते देशपातळीवर पोहचले. राजीव यांचे निधन हा एक मोठा धक्का असून पक्ष व सातव कुटुंबासाठी ही मोठी हानी आहे”, असे म्हणत अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी आवश्यक, केंद्रीय पथकाच्या सूचना

News Desk

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक त्यांची काळजी घ्या?

News Desk

लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी

News Desk