HW News Marathi
Covid-19

देशात आतापर्यंत 8.40 कोटींहून अधिक कोरोना लसींचे डोस दिले

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढताना दिसत आहे. सध्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाखांच्या पार पोहोचली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशव्यापी कोरोना लसीकरणाची मोहिम राबवण्यात येत आहे. ज्याअंतर्गत एकूण तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीचा डोस देण्यात येत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात आतापर्यंत 8 कोटी 40 लाखांहून अधिक कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत.

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत देशभरात कोरोनावरील प्रभावी लसींचे 8.40 कोटींहून अधिक डोस देण्यात आले आहेत. मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 89 लाख 60 हजार 966 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 53 लाख 77 हजार 11 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत फ्रंट लाइन 97 लाख 30 हजार 304 कर्मचाऱ्यांना पहिला डोस आणि 42 लाख 68 हजार 788 कर्मचाऱ्यांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

सध्या भारतात 16 जानेवारी 2021 पासून सुरु करण्यात आलेलं कोरोना लसीकरणाची मोहिम तिसऱ्या टप्प्यांत पोहोचली आहे. देशभरात आतापर्यंत 8 कोटी 40 लाखांहून अधिक लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. देशभरात कोरोना लसीकरणाची सुरुवात 16 जानेवारीपासून करण्यात आली होती. तेव्हापासून आतापर्यंत तीन टप्प्यांमध्ये कोरोना लसीकरणाचं काम केलं जात आहे. पहिल्या टप्प्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांच्या साताऱ्यातील बैठकीत शिवेंद्रराजेंची हजेरी, चर्चांना उधाण

News Desk

कोल्हापुरातील शिवसेना खासदार संजय मंडलिक यांना कोरोनाची लागण

News Desk

मुंबई पोलिसांच्या नव्या आदेशात २ किलोमीटरच्या ‘लक्ष्मणरेषे’चा उल्लेख नाही

News Desk