HW News Marathi
महाराष्ट्र

बाळासाहेब थोरातांनी घेतली पवारांची भेट, राजकीय चर्चांना वेग

पुणे | विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात राजकीय हलचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात बारामतीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

शिवसेनेने जर आमच्याकडे सत्ता स्थापनेचा प्रस्ताव पाठवला तर आम्ही नक्कीच विचार करू आणि दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी चर्चा करू, सत्ता स्थापनेचा निर्णय घेऊ, असे म्हणत थोरात यांनी काल (२६ ऑक्टोबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते. थोरात पाठोपाठ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी एका खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करू असे म्हणाले होते.

मात्र, शरद पवार यांनी विरोधी पक्षाचा दावा केला होता. म्हणून थोरात पवारांची मनधरणी करत विरोधी पक्षात न बसता सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी त्यांच्याशी बोलणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता पवार थोरातांना विरोधी पक्षाच्या बाकावर बसण्यासाठी तयार करणार की, थोरात पवारांना सत्ता स्थापनेसाठी तयार करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पारशी नववर्षानिमित्त उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

Aprna

“…मी दुसरी शिवसेना मानत नाही”, उद्धव ठाकरेंचे वक्तव्य

Aprna

“कोरोनाची फक्त भीती दाखवू नका, तुमची ती नाईट लाईफ, लोकांना फक्त करो ना”, मनसेचा सरकारला सवाल!

News Desk