नवी दिल्ली। देशात आता नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. काल, बुधवारी (२३जून) ८ हजार २०८ने नव्या कोरोनाबाधितांची वाढ होऊन ५० हजार ८४८ रुग्णांची २४ तासांत नोंद झाली आहे. आजही ३ हजार २२१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून देशात २४ तासांत ५४ हजार ०६९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर २४ तासांत १ हजार २३१ जण मृत्यूमुखी पडले असून ६८ हजार ८८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
India reports 54,069 new #COVID19 cases, 68,885 recoveries and 1,321 deaths in the last 24 hours, as per Union Health Ministry
Total cases: 3,00,82,778
Active cases: 6,27,057
Total recoveries: 2,90,63,740
Death toll: 3,91,981Total vaccination: 30,16,26,028 pic.twitter.com/E1e2791qP8
— ANI (@ANI) June 24, 2021
देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ८२ हजार ७७८वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख ९१ हजार ९८१ जणांचा मृत्यू झाला असून २ कोटी ९० लाख ६३ हजार ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या देशात ३ लाख ९१ हजार ९८१ जणांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात ३० कोटी १६ लाख २६ हजार २८ जणांची लसीकरण पार पडले आहे.
आता रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असून ९६.६१ टक्क्यांवर पोहोचला आहे. साप्ताहिक पॉझिटिव्हीटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला आहे, सध्या ३.०४ टक्के आणि दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट २.९१ टक्के झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
*पाच राज्यांमध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित*
नविन बाधितांपैकी ७१ टक्के रुग्ण हे पाच राज्यांमधील आहेत. केरळमध्ये २३.६५ टक्के नवे बाधित आढळून आले आहेत. पाच राज्यांपैकी केरळमध्ये १२,७८७, महाराष्ट्रात १०,०६६, तमिळनाडूमध्ये ६,५९६, आंध्रप्रदेशात ४,६८४ तर कर्नाटकमध्ये ४,४३६ नवे बाधित आढळून आले आहेत. सर्वात जास्त मृतांची संख्या महाराष्ट्रात असून त्यानंतर तमिळनाडूचा क्रमांत लागतो
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.